देश

गोव्यात मासळीची टंचाई 

प्रशांत शेटये

मडगाव : मासळीसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात गेल्या दोन दिवसांपासून मासळीची टंचाई निर्माण झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) सुरु असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मडगावच्या घाऊक मासळी मार्केटात आज अवघी 10 टन मासळीची आवक झाली. एफडीएच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर विक्रेत्यांनी महाराष्ट्र व कर्नाटकातून होणारी मासळीची आयात गेले दोन दिवस बंद केली असून त्यामुळे गोव्यात मासळीची टंचाई भासू लागली आहे. टंचाईमुळे मासळीच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे.

गोव्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या मडगावमध्ये मडगावच्या घाऊक मासळी मार्केटात दरदिवशी सुमारे 65 टन मासळीची आवक होते. आज केवळ श्रीवर्धन - महाराष्ट्र येथून मासळीचे एकच वाहन दाखल झाले. एफडीएची नोंदणी व परवाना असलेल्या वाहनातून ही मासळी आणण्यात आली. त्या व्यतिरिक्त गोव्यातील मच्छीमारांनी पुरवलेली सुमारे 8 टन मासळी मार्केटात आली, अशी माहिती मासळीचे एजंट कांता नाईक यांनी दिली. 

आज अल्प प्रमाणात मासळी उपलब्ध झाल्याने दरात भरमसाठ वाढ झाली. सोमवारी 100 रुपये किलो असलेल्या बांगड्यांचा दर आज 200 रुपये असा होता. लहान सुरमई (1 किलो वजनाची) 500 रुपये किलो, तारली 100 रुपये किलो दराने विकण्यात येत होती. 

मासळीतील फाॅर्मेलीन चाचणी प्रकरणानंतर आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षीत मासळी मिळावी यासाठी एफडीएने संबंधीत व्यावसायिकांवर काही निर्बंध लादले आहेत.एफडीएकडे  नोंदणी न केलेली व इन्सुलेटेड नसलेली इतर राज्यांतील मासळीची वाहने गोव्याच्या सीमेवर अडवून माघारी पाठवण्यात येत आहे. त्याच बरोबर पालिकेचा व्यापार परवाना नसलेल्या मासळी विक्रेत्यांचे नोंदणी प्रमाणपत्र एफडीएने रद्द करून मासळीची विक्री व वितरण न करण्याची सूचना केली आहे. या विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे संकेत एफडीएने दिल्याने सोमवारपासून मासळी व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय मासळी विक्रेत्यांनी घेतला आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतील मासळी पुरवठादारांना मासळी न पाठवण्याची सूचना या विक्रेत्यांनी केली आहे. त्यामुळे गोव्यात मासळीची टंचाई जाणवत आहे. याचा मासेप्रेमींसह हाॅटेल व्यावसायिक व या मासळी व्यवसायाशी निगडीत असलेल्या छोट्यामोठ्या विक्रेत्यांना फटका बसला आहे. 

गोव्यात मासेमारी केली जात असली तरी स्थानिक मच्छीमारांना मिळणारी रावस, बाळे, राणे, कोकरा, हाडे बांगडे, बुगडी आदी मासळी गोवेकरांना पसंत पडत नाही. गोवेकरांच्या आवडीची सुरमई, वेरली, लेपो, बांगडे, मुडदोशी, तामोशी, मोडसो, चणक आदी मासळी गोव्यात महाराष्ट्र, कर्नांटक व इतर राज्यांतून येते. गोव्यात आवक होणाऱ्या मासळीत महाराष्ट्रातील मासळीचे प्रमाण जास्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT