Shots fired at the convoy of Naresh Yadav AAP MLA 
देश

आप आमदाराच्या गाड्यांवर गोळीबार; एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : आपचे नवनिर्वाचित आमदार नरेश यादव यांच्या वाहनांच्या ताफ्यावर काही अज्ञातांनी मंगळवारी रात्री गोळीबार केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. या गोळीबारामध्ये पक्षाचा एक कार्यकर्ता मृत्युमुखी पडला.

किशनगड गावामध्ये ही घटना घडली. यादव हे त्यांच्या समर्थकांसह घरी परतत असतानाच रात्री त्यांच्या वाहनांवर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

वैयक्तिक वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे दिसून येते, असे पोलिसांनी म्हटले आहे. आरोपींनी यादव यांच्या वाहनाच्या दिशेने सात फैरी झाडल्या. अशोक मान असे या गोळीबारामध्ये मरण पावलेल्या कार्यकर्त्याचे नाव असून, जखमी झालेल्या अन्य एकास तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे आपचे खासदार संजय सिंह यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd Test Live: आकाश दीपसमोर न्यूझीलंडने गुडघे टेकले, टॉम ब्लंडल शतकासाठी उभा; नाट्यमय घडामोडींचं पहिले सत्र

श्रेयस अय्यर आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ट्वेंटी-२० संघात खेळणार; हा सामना केव्हा, कुठे व कोणाविरुद्ध होणार?

Vaibhav Sooryavanshi Next Match : आशिया चषक स्पर्धेतील आव्हान संपलं, आता वैभव सूर्यवंशी कधी व कुठे खेळताना दिसणार? जाणून घ्या टीम इंडियाचं पुढील वेळापत्रक

Pune Crime : गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेणार नाही; कोयता गँग, ड्रग्ज माफियांवर कठोर कारवाई करा, सुनेत्रा पवार यांचे पोलिसांना निर्देश

Prithviraj Chavan : मतदारसंघ पुनर्रचना करा, मात्र राज्यांचे जागावाटप बदलू नका; खासदारसंख्या वाढवण्यास काँग्रेसचा विरोध असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी केले स्पष्ट

SCROLL FOR NEXT