supreme-court 
देश

NOTA ला सर्वाधिक मतं मिळाल्यास निवडणूक रद्द व्हावी?; सुप्रीम कोर्टाची केंद्र, ECकडे विचारणा

सकाळ डिजिटल टीम

एखाद्या मतदारसंघात मतदानादरम्यान None Of The Above (NOTA) या पर्यायाला सर्वाधिक मतं मिळाली तर संबंधित मतदारसंघातील निवडणूक निकाल रद्दबातल ठऱवण्याबाबत दाखल याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला (Election Commission) नोटीस पाठवून यावर उत्तर मागवले आहे. 

सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्या. ए. एस. बोपन्ना आणि व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने कायदा आणि न्याय मंत्रालय तसेच निवडणूक आयोगाला याचिकेला उत्तर देण्यासाठी नोटीस पाठवली आहे. याचिकाकर्त्याच्यावतीनं वरिष्ठ अधिवक्त्या मेनका गुरुस्वामी या सुप्रीम कोर्टात उपस्थित होत्या. 

सुप्रीम कोर्टातील अधिवक्ते आणि भाजप नेते अश्विनीकुमार उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत म्हटलं की, जर एखाद्या मतदारसंघात मतदानानंतर NOTA या पर्यायाला सर्वाधिक मतं मिळाली तर त्या मतदारसंघातील निवडणूक निकाल रद्द करण्यात यावा आणि तिथे पुन्हा नव्याने निवडणूक घेण्यात यावी. तसेच या निवडणूक ज्या उमेदवारांना आणि राजकीय पक्षांना जनतेनं नाकारलं आहे. त्या उमेदवार आणि पक्षांवर बंदी घालण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यायला सांगावे अशी मागणीही करण्यात आली आहे. 

याचिकेत पुढे म्हटलंय की, उमेदवार नाकारण्याचा अधिकार आणि नव्या उमेदवारांच्या निवडीमुळे लोकांना आपला असंतोष व्यक्त करण्यास ताकद मिळेल. यामुळे जर मतदार निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराच्या पार्श्वभूमीवर किंवा कामगिरीवर असमाधानी असेल तर अशा उमेदवारांना नाकारुन नवा उमेदवार निवडण्यासाठी नोटाचा वापर करेल. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT