Nitin Gadkari sakal
देश

बेशिस्त वाहन दाखवा, ५०० रूपये मिळवा ! गडकरींची नवी ‘स्कीम'

रस्त्यावर नियमभंग करून, चुकीच्या पध्दतीने पार्किंग केलेल्या वाहनाचे छायाचित्र काढून पाठवा व ५०० रूपयांचे रोख इनाम मिळवा.

मंगेश वैशंपायन

रस्त्यावर नियमभंग करून, चुकीच्या पध्दतीने पार्किंग केलेल्या वाहनाचे छायाचित्र काढून पाठवा व ५०० रूपयांचे रोख इनाम मिळवा.

नवी दिल्ली - रस्त्यावर नियमभंग करून, चुकीच्या पध्दतीने पार्किंग केलेल्या वाहनाचे छायाचित्र काढून पाठवा व ५०० रूपयांचे रोख इनाम मिळवा, ही घोषणा आहे केंद्रीय रस्ते- महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची. अशी बेशिस्त करणाऱया वाहनचालकांना १००० रूपये दंड करण्याचीही तंबी त्यांनी दिली. दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी, वाहनांची बेसुमार संख्या व नियमांचा भंग करण्याची सर्रास प्रवृत्ती यावर फटकेबाजी केली.

गडकरी यांनी बेशिस्त पार्किंग करणाऱयांबाबत रोख रकमेचे बक्षीस जाहीर केले आहे. मात्र आता त्यांच्या मंत्रालयाच्या आसपासच्या रस्त्यांवर पार्किंग च्या नियमांची एशीतैशी करून अगदी फूटपाथवरही बिनदिक्कत लावलेल्या अनेक वाहनांची छायाचित्रे मंत्रालयाकडे पाठवून ५००-५०० रूपये मिळविण्याची पहिली नामी संधी संसद मार्ग, रफी मार्ग, विठ्ठलभाई पटेल हाऊस, पटेल चौक परिसरातील लोकांना मिळाल्याची चर्चा आहे. नियम तोडून रस्त्यांवर पार्किंग करणाऱया वाहनचालकची ही प्रवृत्ती रोखण्यासाठी १००० रूपये दंड करण्याबाबत आपले मंत्रालय लवकरच कायदा आणण्याचाही विचार करत असल्याचे गडकरी म्हणाले. इमारती बांधताना पार्किंगसाठी पुरेशी जागा न ठेवणे खेदकारक असल्याचे सांगून गडकरी म्हणाले की पार्किंगच्या जागेचा अभावामुळे लोक रस्त्यांवरच वाहने उभी करतात.

लोकांना आजकाल गाड्यांचा किती सोस झाला आहे याचे उदाहरण देताना गडकरी म्हणाले की नागपूरला माझ्याकडे स्वयंपाक करणाऱयाकडे २-२ सेकंड हॅंड गाड्या आहेत. चार जणांच्या कुटुंबात आज ६ कार असतात. दिल्लीचे लोक त्यातल्या त्यात भाग्यवान की त्यांची वाहने उभी करण्यासाठी अनेक ठिकाणी वेगळ्या जागा आहेत. मात्र गडकरी यांना त्यांच्या मंत्रालयासमोरचे दृश्य आठवले नसावे असेही बोलले जाते. नवीन संसदेचे काम सुरू नव्हते तेव्हापासूनच परिवहन भवनासमोरही थेट रस्त्यावरच वाहने उभी केली जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Turmeric Market Price : हळदीला सोन्याचा भाव! सांगलीच्या बाजार समितीत हळदीला क्विंटलला तब्बल 65 हजार रुपये दर; दुष्काळामुळे उत्पादनात 40 टक्के घट

Raigad News: कर्जतमधील टोरंट प्रकल्पाला पालकमंत्र्यांचा पाठिंबा; ७० हजार झाडे तोडणार, ७५ हजार लावणार!

Bay of Bengal Low Pressure Area : राज्यात थंडीची चाहूल पण, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात निचांकी ११.३ अंश तापमानाची नोंद

IND vs NZ 4th ODI Live: रोहित शर्मा, इशान किशन यांच्याकडून मोठी चूक; आकिब नबीला राग अनावर, दोन चेंडूंत नाट्यमय घडामोडी Video Viral

Maharashtra Tunnel Road: प्रवास होणार सुसाट! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या धर्तीवर पश्चिम महाराष्ट्रात ३ भुयारी मार्ग; कुठून कुठे जाणार नवे मार्ग?

SCROLL FOR NEXT