Shraddha Murder Case esakal
देश

Shraddha Murder Case: फाशी तर फाशी...'जन्नत'मध्ये अप्सरा मिळेल; आफताबच्या जबाबाने खळबळ

पॉलिग्राफ चाचणीनंतर आफताबने केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या

सकाळ डिजिटल टीम

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालावर (Aftab Poonawalla) दिल्ली इथं तलवारीनं हत्या करण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, पॉलिग्राफ चाचणीनंतर आफताबने केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

पॉलिग्राफ चाचणीनंतर पोलीस व्हॅनमधून नेलं जात होतं. त्यावेळी किमान दोन जणांनी नंग्या तलवारी घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यानंतर अफताबने केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आफताबने आनंदानं फाशी जाईल स्वर्गात मिळेल अप्सरा. असे म्हटले आहे. तर इतकेच नव्हे तर श्रद्धासोबतच्या नात्यादरम्यान, त्याने २० पेक्षा अधिक हिंदू मुलींसोबत संबंध ठेवले होते. पोलिसांना दिलेल्या जबानीतून आफताबची मानसिकता समोर येतीय.

हेही वाचा: दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आफताब हिंदू मुलींना बंबल अॅपवर शोधून आपल्या जाळ्यात अडकवायचा. श्रद्धाला मारल्यानंतर त्याने एका मानसशास्त्रज्ञाला त्याच्या खोलीत आणले होते, तीही हिंदू होती. यावेळी त्याने श्रद्धाची अंगठी भेट देऊन तिला आपल्या जाळ्यात अडकवले. याशिवाय तो आणखी काही हिंदू मुलींच्या संपर्कात होता.

तसेच, श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा मला कोणताही पश्चाताप नाही, असे तो म्हणाला. असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. यासोबत त्याच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप दिसला नाही. चौकशी संपली की तो शांत झोपायचा. त्याने मुंबईतच श्रद्धाची हत्या करून तिचे तुकडे करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्याने पोलिसांना स्पष्टपणे सांगितले.

आपताबवर तलवारीचा हल्ला

आफताबला काल पॉलिग्राफ चाचणीसाठी दिल्लीतील रोहिणी भागातील ‘एफएसएल’ कार्यालयात आणण्यात आलं. चाचणीनंतर सायंकाळी पोलीस आफताबला पुन्हा तिहार कारागृहात घेऊन जाण्यासाठी निघाले असता, हातात तलवारी घेऊन आलेल्या तरुणांनी आफताबवर तलवारीनं वार करण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा तरुणांना रोखण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्यानं बंदूक काढत हवेत गोळी झाडण्याचा इशारा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT