Shraddha Murder Case esakal
देश

Shraddha Murder Case : आफताबची पोलीस कोठडी पाच दिवसांनी वाढवली; नार्को टेस्टलाही परवानगी

सकाळ डिजिटल टीम

Shraddha Murder Case : बहुचर्चित श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला पोलिसांच्या चौकशीत रोज नवनवीन खुलासे करत आहे. आफताबला आज दिल्ली पोलिसांनी व्डिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साकेत न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याला न्यायालायाने आफताबच्या पोलीस कस्टडी पाच दिवसांची वाढ केली आहे. तसेच कोर्टाने आफताबची नार्को टेस्ट करण्यासही परवानगी दिली आहे.

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्येनंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. या ह्त्येमध्ये आरोपी आफताबच्या निर्दयीपणाचीदेखील खूप चर्चा केली जात आहे. या धक्कादायक घटनेनंतर अवघा देश हादरून गेला आहे. तपासात अनेक धक्कादायक खुलासे केले जात आहेत.

आफताबच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे देखील समोर आले आहेत. अफताबने अत्यंत थंड डोक्याने आणि पद्धतशीर नियोजन करून श्रद्धाची हत्या घडवून आणली. इतकंच नाही तर त्याने श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली असली तरी शेवटपर्यंत तिचं शीर फ्रिजमध्येच ठेवून दिलं होतं. त्यानंतर शरीराचे 35 तुकडे वेगवेगळ्या जागी फेकल्यानंतर शेवटी शीर फेकून दिलं.

आफताब पूनावालाने गेल्या मे महिन्यात त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वॉकरची हत्या केली होती. ही बाब आता उघड झाली आहे. आफताबने श्रद्धा वॉकरच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ते घरातील रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले होते आणि ते फेकण्यासाठी तो रोज रात्री मेहरौलीच्या जंगलात जात असे. या खून प्रकरणामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा ‘लव्ह जिहाद’ची चर्चा सुरू झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs PBKS: ऋतुराज गायकवाडने चेन्नईच्या सलग दुसऱ्या पराभवासाठी कोणाला धरलं जबाबदार? म्हणाला, 'कधी कधी आमच्याकडून...'

Nashik Dindori accident : नाशिक येथील दिंडोरी अपघातातील एकाच कुटुंबातील ९ मृतांची नावे समोर, क्रेनने काढले मृतदेह बाहेर

Farmer Death News : काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेतात काम करताना अंगावर वीज पडली; 50 वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather Alert Today : पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे! महाराष्ट्रातील 'या' 11 जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा, हवामान विभागाचा Yellow Alert जारी

Latest Marathi News Live Update : रिक्षा चालकांवर दुहेरी आर्थिक संकट, गॅसदरवाढ आणि तुटवड्याने जगणं कठीण

SCROLL FOR NEXT