Shraddha Murder Case
Shraddha Murder Case esakal
देश

Shraddha Murder Case: श्रद्धाची कपडे कुठे फेकुन दिली; अफताबने दिले स्पष्टीकरण

सकाळ डिजिटल टीम

श्रद्धाहत्याप्रकरणी आफताब पूनावाला याची नार्को टेस्ट करण्यात आली. या दरम्यान आफताबला महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले. दरम्यान, त्याने श्रद्धाच्या कपड्यांसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. (Shraddha Walkar Murder Accused Aftab Poonawala Narco Test Completed)

एफएसएलचे सहायक संचालक संजीव गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने नार्को टेस्टमध्येही श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली आहे. इतकेच नव्हे तर आफताबने नार्को टेस्टमध्ये श्रद्धाचा मोबाईल आणि कपडे कुठे फेकले.

यासोबतच आफताबने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी कोणत्या शस्त्रांचा वापर केला आणि कुठे फेकले हे देखील सांगितले आहे. आता दिल्ली पोलीस पुन्हा एकदा आफताबने सांगितलेल्या ठिकाणी हे पुरावे शोधणार असल्याचे गुप्ता यांनी म्हटले आहे.

हत्या का केली?

श्रद्धाने आफताबसोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे. आफताबच्या अत्याचाराने ती अस्वस्थ झाली होती. अशा परिस्थितीत तिने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पण आफताबला हे आवडले नाही. त्याने श्रद्धाची हत्या केली. मात्र, आफताबने पोलिस चौकशीत सुरुवातीला सांगितले होते की, श्रद्धा लग्नासाठी दबाव टाकत होती. यावरून 18 मे रोजी दोघांमध्ये भांडण झाले होते. यानंतर त्याने श्रद्धाची हत्या केली.

हे ही वाचा: भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

जरी आफताबने नार्को टेस्टमध्ये श्रद्धाच्या हत्येशी संबंधित खुलासा केला असला तरी, ते पुरावे म्हणून न्यायालयात सादर करता येणार नाहीत. मात्र, पॉलीग्राफी आणि नार्को टेस्टच्या माध्यमातून पोलिसांना आणखी सुगावा आणि पुरावे शोधण्यात मदत होत आहे. आफताबने सांगितलेल्या ठिकाणाहून पोलिसांनी श्रद्धाचा मोबाईल आणि कपडे जप्त केले तर दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळेल.

हेही वाचा: आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

दिल्लीतल्या भीमराव आंबेडकर रुग्णालयामध्ये आज आफताब पूनावालाची नार्को टेस्ट झाली. यावेळी या प्रकरणाशी संबंधित अधिकारी, तज्ज्ञ यांची टीम उपस्थित होती. तब्बल दोन तास ही टेस्ट सुरु होती. आफताबने जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं दिल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Narendra Modi in Pune : रेसकोर्सवर अवतरला ‘केसरिया सागर’

Nashik Ashok Kataria Fraud Case: अशोक कटारिया यांचा ‘अटकपूर्व’ फेटाळला! अडचणीत वाढ; हायकोर्टात जाण्याची शक्यता

IPL 2024, KKR vs DC: कोलकातानं मागच्या सामन्यातून धडा घेतला अन् पंतच्या दिल्लीला चारीमुंड्या चीत केलं

SCROLL FOR NEXT