देश

Shraddha Murder Case : निर्घृणतेचा कळस! कुणी बनवलं सूप तर, कुणी...; वाचा अंगावर काटा आणणारे हत्याकांड

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्येनंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

Shraddha Murder Case : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्येनंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. या ह्त्येमध्ये आरोपी आफताबच्या निर्दयीपणाचीदेखील खूप चर्चा केली जात आहे. या धक्कादायक घटनेनंतर अवघा देश हादरून गेला आहे. तपासात अनेक धक्कादायक खुलासे केले जात आहेत.

हेही वाचा : Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

आज आम्ही तुम्हाला अशाच काही हत्याकांडांबद्दल माहिती सांगणार आहोत जी वाचून तुमच्या अंगावर काटा येईल. ज्या पद्धतीने आफताबने हत्येनंतर श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले त्याच प्रमाणे यापूर्वी हत्याकांडामध्येदेखील धक्कादायक प्रकार करण्यात आले होते.

रक्ताने भरली बादली अन् कापला हात

नुकतीच गाझियाबादमध्ये एका तरुणाने एका गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेत खून करणाऱ्या व्यक्तीने आधी मृताच्या डोक्याखाली बादली ठेवून गोळ्या झाडल्या. हत्येनंतर मृत व्यक्तीचे रक्त बादलीत जमा झाले. त्यानंतर आरोपीने मृतदेह घरी नेऊन पुरला. एवढेच नाही तर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने मृत व्यक्तीचा हात कापला. हे प्रकरण गाझियाबादच्या सिहानी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील सिक्रोड गावातून समोर आले आहे.

हत्येनंतर गंगाजलने धुतले तोंड केला पाठ

दिल्लीतील रोहिणीमध्ये सप्टेंबरमध्ये एक प्रकरण उघडकीस आले होते. ज्यामध्ये एका व्यक्तीने आपल्या आईची हत्या केली. यानंतर आईचे तोंड गंगाजलाने धुतले आणि तो तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला. हत्येनंतर आईच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आरोपीने मृतदेहाजवळ धार्मिक पाठही करत स्वताचे आयुष्य संपवले.

सीटबेल्ट लावत कारमध्ये नेला मित्राच मृतदेह

२०१८ मध्ये बरेलीत एका व्यक्तीने १६ हजार रुपयांसाठी मित्राची गोळ्या झाडून ह्त्येचा प्रकार समोर आला होता. हत्येनंतर आरोपीने मित्राचा मृतदेहासोबत गाडीत बसून प्रवासही केला. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून आरोपीने मृतदेह कारच्या समोरील सीटवर सीटब्लेटने बांधला होता. त्यानंतर काही अंतर पार करून आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT