नवी दिल्ली - लॉकडाउनमुळे ठिकाणी अडकलेल्या लाखो मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी नियोजन केलेल्या श्रमिक विशेष रेल्वे गाड्यांमधील सोशल डिस्टन्सिंगचा नियम रेल्वेने मागे घेतला असून आता प्रत्येक गाडीत १,२०० ऐवजी पूर्ण क्षमतेइतके म्हणजे १,७०० लोक घेऊन जाण्यास आज परवानगी देण्यात आली आहे. ज्या राज्यांमध्ये या गाड्या पाठवण्यात येणार आहेत त्याच्या हद्दीत प्रवेश केल्यावर त्यांना तीन ३ स्थानकांवर थांबा देण्याची दुरुस्तीही झाली आहे.
श्रमिक विशेष रेल्वे गाड्यांमधून जास्तीत जास्त मजूरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात नेण्यासाठी रेल्वेचे नियोजन आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे अनेक राज्यांमधून अर्ज आले आहेत आणि ते लवकरात लवकर मार्गी लावण्याचा रेल्वे बोर्डाचा विचार आहे. त्या दृष्टीनेच आजपासून प्रत्येक गाडीत १२०० ऐवजी १७०० प्रवाशांचा नवा नियम लागू करण्यात आला आहे . या गाड्यांमधील डब्यांमध्ये नेहमीप्रमाणे ३ बर्थ असतील, असेल असेही रेल्वेने आज स्पष्ट केले. या विशेष प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये फक्त कन्फर्म तिकीटधारक प्रवाशांनाच प्रवेश मिळेल. ज्यांनी कन्फर्म तिकीट काढले असेल फक्त त्याच प्रवाशांना स्थानकांवरही प्रवेश दिला जाईल. हे तिकीट जवळ असले तर प्रवाशांना रेल्वेस्थानकापर्यंत येण्यासाठी अन्य परवानगी पत्रे नसली तरी चालतील, असेही गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
विमाने सुरु होण्याची शक्यता
रेल्वेने १५ गाड्यांच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सुरू करण्याचे ठरविल्यावर आता देशांतर्गत विमानसेवाही सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. येत्या आठवडाभरात मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये आणि नंतर टप्प्याटप्प्याने अंतर्गत विमानसेवा सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून सुरू होईल अशी शक्यता आहे. मुलकी विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी काल अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर मंत्रालयाचे सचिव प्रदीपसिंग खरोला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे - क्लिक करा
हे खरे की ते खरे ?
सुरवातीच्या टप्प्यात ज्या १५ प्रवासी गाड्या सुरू करण्याचे नियोजन आहे, त्यात मुंबई सेंट्रलपासून उद्या (ता. १२) संध्याकाळी पाच वाजता आणि दिल्लीपासून परवा (ता. १३) दुपारी चार वाजून पंचवीस मिनिटांनी राजधानी रेल्वे सोडण्यात येणार आहे. मुंबई सेंट्रलपासून निघाल्यावर बोरिवली, सुरत, बडोदा, रतलाम, कोटा या प्रमुख स्थानकांवर ती थांबेल. यासाठी जे पहिले वेळापत्रक रेल्वेने तयार केले आहे त्यात १२ आणि १३ मे या तारखांचा उल्लेख आहे. मात्र ही गाडी रोज धावेल असेही त्याच आदेशात म्हटले आहे. यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.