Ayodhya Shri Ram Temple Team eSakal
देश

राम मंदिराच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण; 'या' दिवशी सुरु होणार दर्शन

मंदिराच्या विश्वस्त मंडळाने ही माहिती दिली आहे.

सुधीर काकडे

देश भरातील हिंदू धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या राम मंदिराचे (Shri Ram Temple) बांधकाम सध्या वेगाने सुरु आहे. राम मंदिराचे बांधकाम हे विक्रमी वेळेत पुर्ण केले जाणार असून, आता मंदिराच्या बांधकामाचा पहिला टप्पा पुर्ण झाल्याची माहिती मंदिराच्या विश्वस्त मंडळाने दिली आहे. राम मंदीर विश्वस्त मंडळाने गुरुवारी ही माहीती दिली आहे. तसेच मंदीर लवकरच दर्शनासाठी खूले होणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

देशभरातील राम भक्त आयोध्येमध्ये सुरु असलेल्या राम मंदिराचे बांधकाम पुर्ण होण्याची वाट बघता आहेत. श्री राम मंदीर विश्वस्त मंडळाने गुरुवारी मंदिराच्या बांधकामाबद्दल माहीती दिली आहे. मंदिराच्या बांधकामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाल्याचे विश्वस मंडळाकडून सांगण्यात आले आहे. तसेच पुढच्या टप्प्यासाठी कर्नाटकचे ग्रेनाईट आणि मिर्झापुरचा सँडस्टोन खडक वापरुन या टप्प्याचे काम केले जाणार आहे. विश्वस्त मंडळाने दिलेल्या माहितीनुसार २०२३ मध्ये मंदीर दर्शनासाठी खूले करण्यात येईल.

भव्य मंदिर 107 एकर जागेवर निर्माण केले जाणार आहे. यासाठी 14,30,195 वर्ग फूट जागेची आवश्यकता लागणार आहे. मुख्य मंदिराचे निर्माण 5 एकर जागेवर केले जाणार आहे. इतर जागेवर संग्रहालय आणि पुस्तकालय अशी केंद्रे बनवली जाणार आहेत. राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातून देणगी गोळा केली जातेय.

दरम्यान, मंदिराचे मॉडेल वास्तुकार निखिल सोमपुरा यांनी तयार केले आहे. मंदिराच्या मॉडेलची उंची, आकार, क्षेत्रफळ आणि पायाभूत संरचनामध्ये पूर्वीच्या मॉडेलपेक्षा अनेक बदल करण्यात आले आहेत. मंदिर बांधून तयार होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. मंदिर तीन मजली असणार आहे. शिवाय मंदिर वास्तुशास्त्रानुसार बनवण्यात येईल. मंदिराच्या शिखराची उंची वाढवून 161 फूट करण्यात आली आहे. याशिवाय घुमटांची संख्या तीनवरुन पाच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राम मंदिराच्या उंचीमध्ये 33 फूटांनी वाढ करण्यात येणार आहे. मंदिराच्या जून्या मॉडेलनुसार मंदिराची उंची 268 फूट होती. आता ती 280 ते 360 फूट करण्यात आलीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT