Shrikant Shinde  Sakal
देश

Shrikant Shinde : सध्या प्राधान्य पक्षबांधणीला; उमेदवार बदलण्याचा फटका बसला - श्रीकांत शिंदे

मी मंत्री व्हावे अशी सर्वांची इच्छा असली तरी सध्या गरज पक्षबांधणीची असल्याचे सांगत श्रीकांत शिंदे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदैव कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘‘शेवटच्या क्षणी उमेदवार जाहीर करण्याचा आणि उमेदवार बदलण्याचा फटका शिवसेनेला बसला. या गोष्टी झाल्या नसत्या तर आम्ही दोन अंकी संख्या गाठली असती,’’ अशी कबुली​ शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. झालेल्या चुकांचे विश्लेषण केले जाईल, असेही ते म्हणाले.

मी मंत्री व्हावे अशी सर्वांची इच्छा असली तरी सध्या गरज पक्षबांधणीची असल्याचे सांगत श्रीकांत शिंदे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदैव कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले आहे. त्यांनी मला मंत्रिपद न दिल्यामुळे राज्यात योग्य तो संदेश गेला आहे. माझ्यापेक्षा वरिष्ठ नेते पक्षात आहेत. त्यांना पक्षाने संधी दिली.

लोकसभा निवडणुकीत दोन खासदारही निवडून येतील, असे वाटले नव्हते. मात्र जिंकून येण्याचा आमचा सरासरी दर चांगला आहे.’’ काही पक्षातील लोकांनी स्वत:च्या मुलाला पॅराशूट लॅंडिंग करुन आमदार करून घेतले, त्यानंतर त्याला मंत्रिपद दिले, असा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मारला.

मुख्यमंत्र्यांनीच दिला प्रस्ताव : जाधव

‘शिवसेनेच्या सर्व खासदारांनी मंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. मात्र शिंदे यांनी संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी माझ्या नावाची शिफारस केली,’ असे खा. प्रतापराव जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT