Fire Accident Sakal
देश

श्रीनगर : व्यवसायिक ईमारतीला भीषण आग; अग्निशामक दलाचा जवान जखमी

आग एवढी भीषण होती की धुराच्या लोटांनी आकाश व्यापून टाकलं होतं.

दत्ता लवांडे

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील (Jammu Kashmir) एका व्यवसायिक ईमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना श्रीनगर जिल्ह्यातील राजबाग येथे घडली असून गुरुवारी सकाळी आग लागली असल्याचं समोर आलं आहे. या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाल्याचं समोर आलं आहे.

सकाळी साधारण साडेअकरा वाजता ही घटना घडली आहे. या व्यवसायिक ईमारतीला आग लागल्यानंतर घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले. आग एवढी भीषण होती की धुराच्या लोटांनी आकाश व्यापून टाकलं होतं. त्यानंतर त्यांनी ईमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढल्याचं अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सध्या ही आग नियंत्रणात असून या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान या कारवाईत अग्निशामक दलाचा एक जवान जखमी झाला असून पुढील उपचारासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तसेच सदर घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT