Shyam Rangeela and narendra modi Shyam Rangeela and narendra modi
देश

‘माजी नगरसेवकही रस्त्यावर थांबत नाहीत, ते तर पंतप्रधान आहेत भाऊ’

इथे गाडीच्या मागे माजी नगरसेवक असे लिहिणारेही रस्त्यावर थांबत नाहीत...

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विनोद करून प्रकाशात आलेला श्याम रंगीलाने (Shyam Rangeela) पुन्हा एकदा ट्विट करून नरेंद्र मोदी यांना लक्ष केले आहे. पंजाबमध्ये पंतप्रधानांची गाडी तब्बल १५ ते २० मिनिट रस्त्यावर थांबल्याने त्याने लक्ष्य केले आहे. माजी नगरसेवक रस्त्यावर थांबत नाही, तेर तर देशाचे पंतप्रधान आहे, असे ट्विट (tweet) त्याने केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची बुधवारी पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ही सभा ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे. हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर पंतप्रधानांचा ताफा उड्डाणपुलावर पोहोचला होता, तेव्हा काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे दिसून आलं. या आंदोलकांमुळे पंतप्रधान जवळपास १५ ते २० मिनिटे फ्लायओव्हरवर अडकून पडले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही एक मोठी चूक होती.

ही मोठी घटना होती. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती. मी जिवंत पोहोचलो, असे ते म्हणाले होते. अशात मोदींचे सारखे भाषण करणारा श्याम रंगीलाने (Shyam Rangeela) ‘इथे गाडीच्या मागे माजी नगरसेवक असे लिहिणारेही रस्त्यावर थांबत नाहीत, ते तर देशाचे पंतप्रधान आहेत भाऊ’ असे ट्वित करून पुन्हा वादाला तोंड फोडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT