DK Shivakumar  and Siddaramaiah News
DK Shivakumar and Siddaramaiah News 
देश

Karnataka CM : सिध्दरामय्या अन् शिवकुमार यांचा आज शपथविधी; खर्गेंच्या लेकासह 'हे' ८ आमदार बनणार मंत्री

रोहित कणसे

कर्नाटकात आज, २० मे रोजी नवं सरकार स्थापन होणार आहे. सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री म्हणून तर डीके शिवकुमार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या व्यतिरिक्त फक्त आठ आमदारांना मंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. याबद्दल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी माहिती दिली आहे. यापूर्वी अंदाज व्यक्त केला जात होता की तब्बल २८ आमदारांना कॅबिनेट मंत्रिमंडळात सहभागी करण्यात येईल. तरसे सिध्दरामय्या आणि शिवकुमार या दोघांच्या गटाला बरोबरीचा वाटा दिला जाणार असल्याची देखील चर्चा होती.

कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या ज्या नेत्यांना आज मंत्री बनवण्यात येणार आहेत त्यामध्ये डॉ. जी परमेश्वर, केएच मुनियप्पा, केजे जॉर्ज. एमबी पाटील, सतीश जारकीहोली, प्रियांका खर्गे, रामलिंगा रेड्डी आणि बीझेड जमीर अहमद खान यांची नावे आहेत. यापैकी प्रियांक खर्गे हे काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांचे पुत्र आहेत.

बंगळुरूला रवाना होण्याआदी मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितलं की, आज शपथग्रहण सोहळा आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासहित आठ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. मी देखील या कर्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात आहे. कर्नाटकात नवीन आणि मजबूत सराकर आल्याने मी आनंदी आहे. यामुळे कर्नाटकचा विकास होईल आणि त्यासोबतच देशात चांगले वातावरण राहील.

खर्गे यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, एनसीपी प्रमुख शरद पवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिलं आहे. नॅशनल कॉन्फ्रसचे प्रमुख फारुख अब्दुल्ला आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासहित इतरांना देखील निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. मात्र, ममता बॅनर्जी या सोहळ्यात सहभागी होणार नाहीयेत.

'यांना' निमंत्रण नाही

केरळमध्ये सत्तेत असलेले डाव्या लोकशाही आघाडीचे (एलडीएफ) ने कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्यायांच्या शपथ ग्रहण सोहळ्याला केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना निमंत्रण न दिल्याबद्दल शुक्रवारी काँग्रेसवर टीका केली आहे. एलडीएफने काँग्रेसचे हे पाऊल अपरिपक्व राजकारण आणि कमकुवतपणा दर्शवते असे म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Update: पुण्यात तूर्तास पाणीकपात नाही; महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांचं स्पष्टीकरण..

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी पुन्हा उपसलं उपोषणांचं हत्यार; या तारखेपासून ‘सगेसोयरे‘साठी पुन्हा सुरू करणार आंदोलन

IPL 2024 प्लेऑफपूर्वी गंभीरच्या कोलकाताला मोठा धक्का, स्टार सलामीवीरने अचानक सोडली संघाची साथ

Rinku Singh: फ्लावर नहीं फायर है... केकेआरच्या रिंकू सिंगचा 'पुष्पा-पुष्पा' गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

Melinda Gates: मेलिंडा गेट्स यांनी गेट्स फाऊंडेशनचा दिला राजीनामा; पुढील कामासाठी मिळणार 1,00,000 कोटी रुपये

SCROLL FOR NEXT