Navjyot Singh Siddhu and Archana Punan Singh
Navjyot Singh Siddhu and Archana Punan Singh Sakal
देश

सिद्धूचा पराभवाने अर्चनाची खुर्ची धोक्यात! मजेदार मीम्स व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये (Kapil Sharma Show) अर्चना पूरण सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू विशेष जज म्हणून काम पाहत आहेत. अर्चना आणि सिद्धू दोघेही जजच्या खुर्चीवर बसून कपिल शर्मा शोची मजा द्विगुणित करत आहेत. एकीकडे सिद्धू आणि कपिल वर्षानुवर्षे एकत्र आहेत, तर अर्चनाही कपिलच्या करिअरचा महत्त्वाचा भाग आहे. पण जेव्हापासून अर्चनाला कपिलच्या शोमध्ये जजची खुर्ची मिळाली तेव्हापासून शोचे कॉमेडियन आणि चाहते तिला सिद्धूच्या नावाने चिडवत आहेत. पण आता पंजाब निवडणूक 2022 (Punjab Election) चे निकाल पाहता सिद्धू लवकरच शोमध्ये परत येऊ शकतो असे दिसते. असं आम्ही नाही तर ट्विटर वापरकर्ते म्हणत आहेत. (Navjyot Singh Sidhu's defeat threatens Archana Puran Singh's chair! Funny memes go viral)

अर्चनाची खुर्ची धोक्यात-

नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते 2022 च्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीतही उभे राहिले. मात्र, आता सिद्धूच्या स्वप्नांचा चुराडा होताना दिसत आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष प्रचंड बहुमताने आघाडीवर आहे. केजरीवाल यांच्या पक्षाने सीएम चन्नी, कॅप्टन अमरिंदर सिंग, प्रकाश सिंग यांच्यासह नवज्योत सिंग सिद्धू यांचा पराभव केला आहे. अशा परिस्थितीत सिद्धू आणि अर्चना यांच्यावर बरेच मीम बनवले जात आहेत. यासोबतच हे मीम्स देखील ट्विटरवर व्हायरल झाले आहेत.

अर्चना पूरण सिंगसाठी ही कठीण आणि अडचणीची वेळ असल्याचे ट्विटर वापरकर्त्यांचे म्हणणे आहे, कारण आता त्यांची द कपिल शर्मा शोची खुर्ची हिसकावून घेतली जाणार आहे. निवडणूक हरल्यानंतर सिद्धू कपिल शर्मा शोमध्ये परतणार असल्याचे युजर्सचे म्हणणे आहे. त्याचे राजकिय करियर आता संपले आहे.

तुम्ही युजर्सचे काही ट्वीटदेखील पाहू शकता-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT