Ramzan Eid Namaz esakal
देश

Eid-Ul-Fitr: ईदचा चंद्र दिसला! उद्या देशभरात साजरी होणार रमजान ईद

शिया चंद समितीनं शुक्रवारी चंद्र दिसल्याची घोषणा करत उद्या ईद साजरी होणार असल्याचं जाहीर केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : रमजानचा पवित्र महिना आता संपला असून आज ईदचा चंद्र दिसल्यानं उद्या (२२ एप्रिल) देशभरात ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी होणार आहे. यापार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांमध्ये या उत्सवाचा उत्साह असून त्यादृष्टीनं ते तयारीलाही लागले आहेत. यामुळं गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेले रोजेही आता संपले आहेत. (sighting of cresent moon Eid ul Fitr to be celebrated in India tomorrow)

कालच सौदी अरेबिया आणि अखाती देशांमध्ये ईदचा चंद्र दिसला होता त्यामुळं आजच त्या ठिकाणी ईद साजरी झाली. आज भारतातही चंद्र दिसल्यानं मुस्लिम धर्मियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. शिया चंद समितीनं शुक्रवारी चंद्र दिसल्याची घोषणा करत उद्या ईद साजरी होणार असल्याचं जाहीर केलं आहे.

शिरखुर्म्यासाठी ओळखली जाते रमजान ईद

ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी करताना मुस्लिम धर्मियांच्या घरी खिरखुर्म्याचा खास बेत असतो. यांसह अनेक गोड पदार्थही केले जातात. या फराळासाठी नातेवाईक आणि शेजाऱ्यापाजाऱ्यांना निमंत्रणही दिलं जातं. मुस्लिम समाजातील हा सर्वात पवित्र आणि मोठा सण असल्यानं या दिवशी नवीन कपड्यांसह भेटवस्तू दिल्या जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Shivajinagar Court Gangwar History : ४२ वर्षांपूर्वीही शिवाजीनगर कोर्टाबाहेर झाला होता 'असाच' रक्तरंजित थरार! माळवदकर टोळीने घेतला होता बाळू आंदेकरचा बळी; वाचा पुण्यातील टोळीयुद्धाचा इतिहास

८४ व्या वर्षीही आशा पारेख घेतात फिटनेसची काळजी! रात्रीच्या जेवणात असतं खास कॉम्बिनेशन

Taj Mahal: जगप्रसिद्ध ताजमहाल पाहायला जाताय? सावधान! माकडांचा धुमाकूळ, पर्यटकांवर हल्ले

NIC Portal Issue : एनआयसी पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि फुलंब्री तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची मदत जमा होण्यास सुरुवात

Latest Marathi News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना छळाल तर जेलमध्ये जाल!

SCROLL FOR NEXT