Sikkim Flood 
देश

Sikkim Flood Update : सिक्किममध्ये पुराचं थैमान! सहा जवानांसह १९ जणांचा मृत्यू,१००हून अधिक बेपत्ता

रोहित कणसे

सिक्किममध्ये ढगफुटी झाल्याने मोठं संकट ओढावल्याचे पाहायला मिळाले. अचानक कोसळलेल्या पाण्यामुळे तिस्ता नदीने रौद्र रुप घएतलं आणि यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागल्या आहे. आतापर्यंत या पुरात १९ लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. यामध्ये लष्कराचे ६ जवान देखील आहेत. आतापर्यंत १६ जवानांसह १०० हून अधिक लोक अद्या बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. तर तब्बल ३००० पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी अडकले आहेत.

सिक्किममध्ये आलेल्या या भीषण पुरातून आतापर्यंत २५०० लोकांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. तर ६००० लोकांना रिलीफ कँपमध्ये ठेवण्यात आले आहे. पुराची परिस्थिती लक्षात घेता शिक्षण विभागाने १५ ऑक्टोबरपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राज्य सरकारन पर्यटकांनी सध्या सिक्किममध्ये येऊ नये असे सांगितले जात आहे, सरकारने अचानक आलेल्या पुरामध्ये लष्कराच्या बेस कँपमधून स्फोटकं- शस्त्रास्त्र वाहून गेल्याच्या पार्श्वभूमिवर अॅडव्हायजरी जारी केली आहे. तसेच पुरामुळे येथील पावर इफ्रास्ट्रक्चरचे नुकसान झाले आहे. वीज मंत्रालयाने पाणी कमी झाल्यानंतर सिक्किममध्ये हायड्रोपावर प्रोजेक्टला झालेल्या नुकसाणीची पाहणी करण्यात येईल.

सिक्किममध्ये ४ जिल्हे- मंगन, गंगटोक, पाक्योंग आणि नामची या भागात पुरामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. येथे २२ हजार पेक्षा अधिक लोक प्रभावित झाले आहेत. तर २ हजार पेक्षा अधिक लोकांना रेस्क्यू करण्यात आले आहे. येथे २६ रिलीफ कँप उभारण्यात आले आहेत.या जिल्ह्यांना पाण्याची पाइपलाइन, सीवेज लाइन आणि २५० हून अधिक घरांचं नुकसान झालं आहे. तर ११ ब्रिज देखील वाहून गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandoli National Park : चांदोली जंगलात वाघांचे अस्तित्व वाढले; गवे, डुकरं बदलताहेत अधिवास, वनविभाग कोणतं पाऊल उचलणार?

Babar Azam घरगुती वाघ! PSL मध्ये शतक झळकावून केली विराट कोहली, अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी; रोहितला मागे सोडले

Mumbai News: वाहतूक नियम तोडणाऱ्यांसाठी वाईट बातमी! ‘वन नेशन, वन ई-चालान’ महाराष्ट्रात लागू; नियमभंग केला तर थेट दंड

कुर्डुवाडीच्या प्रियांतिकाची सिनेसृष्टीत दमदार एंट्री! ‘फुला’ चित्रपटातून मांडली मुरळीच्या जगण्याची वेदना; चित्रपटाचे क्रिएटिव्ह डिरेक्टर अमर देवकर बार्शीचे, वाचा...

ICSE and ISC Result : ‘आयसीएसई’चा ९९.१८ टक्के, तर ‘आयएससी’चा ९९.१३ टक्के निकाल; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे निकाल जाहीर

SCROLL FOR NEXT