Sikkim krantikari morcha assembly election 2024  Esakal
देश

Sikkim Assembly Election: सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने पुन्हा मिळवली सत्ता, विरोधकांचा एकच उमेदवार विजयी

Sikkim Krantikari Morcha: पण या वादळात एक विरोधी उमेदवार होता जो धैर्याने लढला आणि जिंकलाही. त्या नेत्याचे नाव तेनझिंग नोरबू लामथा आहे

आशुतोष मसगौंडे

मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्या नेतृत्वाखालील सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) ने सिक्कीम विधानसभा निवडणुकीत 32 पैकी 17 विधानसभा जागांवर बहुमताचा आकडा पार करत सत्ता कायम राखण्यात यश मिळवले आहे.

सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने 32 पैकी 31 जागा जिंकल्या असून विरोधी सिक्कीम डेमोक्राटीक फ्रन्टला फक्त एक जागा मिळाली आहे.

सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) सध्या मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आहे. त्यांची थेट स्पर्धा सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटसोबत आहे. भाजप आणि काँग्रेसची येथे नाममात्र उपस्थिती आहे.

सिक्कीमचे मुख्यमंत्री आणि सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) प्रमुख पीएस तमांग यांनी रविवारी सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (SDF) सोमनाथ पौड्याल यांचा 7,044 मतांनी पराभव करून राहेनोक विधानसभा जागा जिंकली.

तमांग यांना 10,094 मते मिळाली, तर सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटमधील त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला 3,050 मते मिळाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रेमसिंग तमांग यांच्या नेतृत्वाखालील सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने राज्यातील विधानसभेच्या 32 पैकी 31 जागा जिंकल्या आहेत. पण या वादळात एक विरोधी उमेदवार होता जो धैर्याने लढला आणि जिंकलाही. त्या नेत्याचे नाव तेनझिंग नोरबू लामथा आहे, जो श्यारी विधानसभा मतदारसंघातून सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचा उमेदवार होता.

तेनझिंग यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाच्या कुंगा निमा लेपचा यांचा १३१४ मतांनी पराभव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT