Silvassa Murder Case 
देश

Silvassa Murder Case : भय संपेना! पत्नी अन् मुलीची हातोड्याने हत्या; १५ वर्षीय मुलीचे तुकडे करून नाल्यात फेकले

रोहित कणसे

देशभरात मगील काही दिवसांपासून एकापाठोपाठ एक भीषण हत्याकांडाचे प्रकार समोर येत आहेत. आता पुन्हा एकादा दमण दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील सिलवासा येथून अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

येथील एका ५२ वर्षीय व्यावसायिकाला त्याच्या ४३ वर्षीय पत्नीची हत्या, त्यांच्या १५ वर्षांच्या मुलीचे तुकडे करून तिच्या शरीराचे अवयव कालव्यात फेकल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश मेहता यांनी रागाच्या भरात आपल्या मुलीची हत्या केली. सोमवारी संध्याकाळी मेहता यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून पत्नीच्या मृत्यूबद्दल माहिती दिली. मात्र, नंतर चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

योगेश मेहताने पत्नीशी झालेल्या वादानंतर पत्नीची हत्या केली आणि नंतर रागाच्या भरात आपल्या मुलीची देखील हत्या केली. सोमवारी संध्याकाळी मेहता याने सुरुवातीला पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून पत्नीच्या मृत्यूची माहिती दिली. मात्र, नंतर चौकशीदरम्यान त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

हत्येची नेमकी वेळ आणि तारीख पोलिसांनी अद्याप निश्चित केलेली नाही. मात्र योगेशने १० जून रोजी आपल्या मुलीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे अवयव कालव्यात फेकल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. कारण ११ जून रोजी दादरा गावाजवळील डेमणी कालव्यात काही मृतदेहांचे तुकडे आढळले होते.

सिलवासा पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, अजूनही शोध सुरू आहे पण आरोपी दोन्ही हत्येबाबत तपशील देत नाहीये. मेहता यांची यार्न कंपनी असून सिल्वासा आणि नवसारी येथे त्यांची मालमत्ता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. पोलिसांच्या चौकशीनंतर मेहताने आपल्या मुलीचा चाकूने तुकडे करण्यापूर्वी पती आणि मुलगी दोघांचीही हातोड्याने हत्या केल्याचे सांगितले.

प्राथमिक चौकशीत अधिकाऱ्यांना आढळून आले की, वारंवार भांडणे व भांडण होत असल्याने आरोपीने पत्नीची हत्या केली.. त्यांच्या लग्नाला सुमारे २० वर्षे झाली होती आणि त्यांना १८ आणि १५ वर्षांच्या दोन मुली होत्या.

पीडित महिलेची मोठी मुलगी हत्येच्या वेळी हजर होती, या मतीमंद असलेल्या मुलीने त्यांना गुन्ह्याबद्दल काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांकडून चाकूचा शोध सुरू असतानाच पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला हातोडा जप्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चौथ्या T20I मध्ये भारतीय संघाचा लाजीरवाणा पराभव'या'३ मोठ्या चुकांमुळे मालिका गमावली,गंभीर हतबल, एकटा कर्णधार श्रेयस करणार तरी काय?

Student End Life : गृहपाठ न केल्याने २० रुपयांचा दंड; आठवीतील विद्यार्थिनीने चिठ्ठी लिहून उचललं टोकाचं पाऊल, नोटमध्ये नेमकं काय?

दोन्ही भाऊ इंडस्ट्रीत, चांगलं कमावता, एकत्र कुटुंबात राहता मग घरखर्च कोण करतं? अधोक्षज कऱ्हाडेने सांगितलं आर्थिक गणित

Mumbai News: मुंबईत बेस्ट चालकाचा अजब कारनामा! शेवपुरीसाठी बस थांबवून प्रवाशांचा खोळंबा; जाब विचारणाऱ्यांना चालकाची शिवीगाळ

'तू नग्न अवस्थेत सीन करशील का?' दिग्दर्शकाने सैफ अली खानकडे केलेली विचित्र मागणी, अभिनेता म्हणाला...

SCROLL FOR NEXT