Sino-Indian War of 1962 google
देश

...त्या युद्धाचे चित्र वेगळे असते

१९६२ च्या भारत चीन युद्धात हवाईदलाचा सहभाग ठरला असता मोलाचा ; जवानांनी केल्या भावना व्यक्त

अक्षता पवार -सकाळ वृत्तसेवा

अरुणाचल प्रदेश : भारत आणि चीन यांच्यातील १९६२ च्या युद्धाला आता ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. या युद्धाच्या इतिहासातून धडे घेण्याची गरज आहे. त्यावेळी झालेल्या युद्धात हवाईदलाचा सहभाग असता, तर नक्कीच युद्धाचे चित्र काही वेगळे असते. ईशान्येकडील नियंत्रण रेषेवर झालेल्या संवादात जवानांनी आपले मत व्यक्त केले. सुमारे १५००० फूट उंच शिखरावर, सतत बदलत राहणारे वातावरण, हाडे गोठ्णारी थंडी अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जवान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) देश संरक्षणाची जबाबदारी पार पाडत आहेत. नियंत्रण रेष म्हणल की डोळ्यासमोर एक मोठी रेष उभी राहते.

मात्र एलएसीवर प्रत्यक्षात अश्या कोणत्याही रेषा आखण्यात आल्या नसून दोन्ही देशांचे सैनिक आपापल्या हद्दिचे रक्षण करत आहेत. यासाठी प्रत्यक्ष संपूर्ण सिमेची पाहणी केली जाते. भारतीय सैन्य तेव्हा ही सक्षम होते आणि आज ही आहे. युद्धात अडचणी आल्या त्या म्हणजेच सैन्याचे मनुष्यबळ आणि शस्त्रास्त्रांची कमतरता. यासाठी हवाईदलाच्या माध्यमातून या दोन्हींचा पुरवठा झाला असता तर नक्कीच युद्धात विजय मिळविणे शक्य झाले असते. मात्र त्या काळात याकडे दुर्लक्ष करण्यात आले. भारत चीन युद्धाबाबत येथील जवानांशी बातचीत केली असता त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

चीनद्वारे अनेकवेळा घुसखोरीचे प्रकार घडले आहेत. सिमालगत भागात आपल्या सैन्यासाठी चीन विविध प्रकारच्या पायाभूत सुविधा मजबूत करत आहे. तर भारतीय सैन्यासाठी ही सीमावर्ती भागात विकासकामांवर भर दिला जात आहे. त्यामुळे भारताने नियंत्रण रेषेजवळ सुविधांच्या निर्मितीवर भर देऊ नये, अशी चीनची भूमिका दिसून येते. फ्लॅग मीटिंगमध्ये ही चर्चा करण्यास चीनद्वरे टाळाटाळ करत त्यातून समाधानकारक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न होत नाही. संरक्षण क्षेत्राला मिळणार निधी चीनच्या तुलनेत कमी आहे. चीनच्या युद्धापासुन धडे घेत भारताने सीमावर्ती भागात पायुभुत सोईसुविधावर भर देण्यास सुरवात केली आहे. असे यावेळी झालेल्या संवादातून समजले.

प्रत्यक्ष लेखा जोखा

अरुणाचल प्रदेश मध्ये अद्याप सीमेलगत दुर्गम भाग असे आहेत ज्या ठिकाणी विकासकामांची खूप गरज आहे. बुमला येथून दामतेंगकडे जाताना अजून ही डोंगरातील रस्ते खचलेले आहेत. मातीच्या या रस्त्यांवर पावसाळ्यात पाणी साचल्याने लष्करी वाहनांची ये जा देखील जोखमेने होते. येथे काही ठिकाणी कामे सुरू असली तरी ते पूर्ण होण्यास आणखीन काही वर्षांचा कालावधी लागू शकतो. तर काही भागात संपर्क साधण्यासाठी अडचणी येतात. आज मोबाईल फोनची सुविधा गावागावांमध्ये पोहचली असली तरी अरुणाचल येथील दामतेंग, बुमला सारखे आणखीन काही खोरे आहेत जिथे थेट 'झीरो रेंज' सुरू होते. त्यामुळे संपर्क साधने अत्यंत अवघड आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NTA Exam Calendar 2026-27 Out : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई मेन, यूजीसी-नेटसह प्रमुख परीक्षांच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Tata Sons Reappointment : RBI च्या निर्देशानंतर टाटा समूहात मोठा उलटफेर! नोएल टाटांचा विरोध डावलून एन. चंद्रशेखरन यांची अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती

Shivsena Case : शिंदे गटाला पक्ष, धनुष्यबाण चिन्ह देताना कोणते निकष? सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला थेट सवाल, सुनावणीत नेमकं काय घडलं?

'कौलारू माडी गं, हिरव्या बागा कोकणा...' गाण्यावर वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे यांचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणतात-

Latest Marathi News Update : 'निवडणूक आयोगाला आपली घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्यापासून अनिश्चित काळासाठी रोखले जाऊ शकत नाही'

SCROLL FOR NEXT