देश

अभिमानास्पद! भारताची 'सिरीशा' झेपावणार अवकाशात

विनायक होगाडे

नवी दिल्ली : दिवंगत भारतीय अंतराळवीर कल्पना चावला हिच्या पावलावर पाऊल ठेवत आंध्रप्रदेशची सिरीशा बांदला ही दुसरी महिला अंतराळवीर ११ जुलै रोजी अवकाशात भरारी घेईल. व्हर्जिन गॅलेक्टिकचे ‘व्हीएसएस युनिटी’ हे यान अंतराळवीरांना घेऊन न्यू मेक्सिको येथून अवकाशात झेपावणार आहे. या मोहिमेचे संस्थापक रिचर्ड ब्रॅन्सन हे देखील या मोहिमेत सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोण आहे सिरीशा बांदला?

सिरीशाने परड्यू विद्यापीठातून ॲरोनॉटिकल इंजिनिअरिंगचे उच्च शिक्षण घेतले असून तिने २०१५ मध्येच व्हर्जिन गॅलेक्टिक या कंपनीमध्ये प्रवेश केला होता. ती अवघ्या ३४ वर्षांची आहे. याच कंपनीमध्ये सरकार व्यवहारविषयक समितीची ती उपाध्यक्ष देखील आहे. जॉर्जटाउन विद्यापीठातून तिने एमबीएची पदवी मिळवली होती. ब्रॅन्सन आणि बांदला यांच्यासोबत कंपनीचे मुख्य अंतराळवीर मार्गदर्शक बेथ मोजेस आणि अभियंते कॉलिन बेनेट हे देखील या मोहिमेत सहभागी होतील. दावे मॅक्के आणि मायकेल मासुक्की हे या यानाचे पायलट असतील.

आंध्रप्रदेशात मूळ

सिरीशा बांदलाचा जन्म आंध्रप्रदेशातील गुंटूर येथे झाला होता. पुढे तिचे सगळे बालपण टेक्सासमधील ह्युस्टन शहरामध्ये गेले. आता कल्पना चावलानंतर अंतराळात भरारी घेणारी ती दुसरी भारतात जन्मलेली महिला अंतराळवीर ठरणार असून अवकाशात जाणारी ती चौथी भारतीय व्यक्ती ठरेल. याआधी राकेश शर्मा, कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांनी अवकाशात भरारी घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोरच्या दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT