farooq abdullah esakal
देश

Farooq Abdullah : पाकिस्तानशी चर्चेशिवाय परिस्थिती सुधारणार नाही - फारुख अब्दुल्ला

माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचे मत

सकाळ वृत्तसेवा

श्रीनगर : ‘‘जी-२० सारख्या बैठका घेतल्यामुळे जम्मू-काश्‍मीरमध्ये प्रर्यटनाला चालना मिळणार नाही. त्यासाठी भारत आणि पाकिस्तानने चर्चा करून राज्याबाबत सर्वमान्य तोडगा काढला पाहिजे,’’ असे मत जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी आज व्यक्त केले. लोकांनी निवडलेले सरकार नसल्यामुळे राज्याचे खूप मोठे नुकसान होत आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

‘‘जी-२० बैठकांमुळे त्या देशांतील पर्यटक राज्यात यायला सुरुवात होणार आहे का? हा खरा प्रश्‍न आहे. परंतु, राज्यातील स्थिती सुधारत नाही तोपर्यंत ते शक्य होणार नाही. आणि दोन्ही मोठे देश चर्चा करून प्रश्‍न सोडवत नाहीत, तोपर्यंत स्थिती सुधारणे शक्य नाही,’’ असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

जी-२० बैठकांचा राज्याला काय फायदा झाला या प्रश्‍नावर ते म्हणाले, ‘‘पायाभूत सुविधांच्या बाबतीत फायदा झाला. रस्त्यांची स्थिती सुधारली, रस्त्याच्या कडेच्या भिंती सुशोभित झाल्या. रस्त्यांवरील बंद असलेले दिवे पुन्हा सुरू झाले.’’

राज्यामध्ये लोकनियुक्त सरकार नसल्याचा संदर्भ घेऊन अब्दुल्ला म्हणाले, ‘‘लोकनियुक्त सरकार असते तिथेच लोकशाही असते. नायब राज्यपाल आणि त्यांचे सल्लागार संपूर्ण राज्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत.

निवडून आलेले आमदार हे आपापल्या मतदार संघांकडे लक्ष देत असतात. ते त्यांचे काम असते. बाबूशाहीला लोकांचे देणेघेणे नसते. कारण ते थेट ६०व्या वर्षी निवृत्त होत असतात. उलट त्या त्या भागातील आमदाराला दर पाच वर्षांनी लोकांसमोर जायचे असते. जर त्याने काम केलेले नसेल, तर त्याला मते मिळणार नाहीत. त्यामुळे निवडणुका होणे महत्त्वाचे आहे.’’

रेल्वे अपघाताची चौकशी व्हावी

ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघाताबाबत बोलताना फारुख अब्दुल्ला म्हणाले, ‘‘जगातील मोठ्या अपघातांपैकी हा एक अपघात आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे आणि अपघाताला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT