Vaccination Vaccination
देश

दोन तृतीयांश 18+ लोकसंख्येला पहिला डोस; तर 'या' राज्यांमध्ये संपूर्ण लसीकरण

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतातील 18+ लोकसंख्येपैकी 66 टक्के लोकसंख्येने कोरोनाचा कमीतकमी एक डोस घेतला आहे. तर 23 टक्के 18 + लोकसंख्येने दोन्ही डोस घेतले आहेत. काही राज्यांनी केलेल्या प्रचंड कामामुळे आपण हे साध्य करू शकलो आहोत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे.

पुढे ते म्हणाले की, गेल्या 24 तासांमध्ये, कोरोनाची 31,000 प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि यातील बहुतेक प्रकरणे केरळ आणि महाराष्ट्रातून नोंदवली गेली आहेत. मात्र, ही संख्या कमी होत आहे. गेल्या आठवड्यात एकूण रुग्णांपैकी 62.73% प्रकरणे केरळमधून नोंदवली गेली आहेत.

सलग 12 व्या आठवड्यामध्ये, विकली पॉझिटीव्हीटी रेट कमी होताना दिसत आहे तो 3% पेक्षा कमी आहे. सध्या भारतातील रिकव्हरी रेट हा 97.8% आहे.

देशातील सहा राज्ये अथवा केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या एकूण लोकसंख्येला पहिल्या डोस हा 100% दिला आहे. यामध्ये लक्षद्वीप, चंदीगड, गोवा, हिमाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे आणि सिक्कीम आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

पुढे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी 90 टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला पहिला डोस दिला आहे. यामध्ये दादरा नगर हवेली, केरळ, लडाख आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: राज ठाकरे म्हणजे मानाला भुकेलं पोरगं, कुचक्या कानाचं; मनोज जरांगेंची खोच टीका

Lover Killed Girl : सोशल मीडियावर महिन्याची ओळख, प्रियकराला भेटल्यानंतर तीचा खून केला अन् आंबा घाटात फेकला मृतदेह पण एक चूक...

टीम पॅराडाईजने घेतले मोठे पाऊल, हॉलिवूड सहयोगाद्वारे जागतिक प्रदर्शनीसाठी केली तयारी

Latest Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली

Solapur Ashtavinayak Temples: सोलापुरातील अष्टविनायकांचे दर्शन घ्यायचंय? जाणून घ्या सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेली ही मंदिरे कुठे आहेत

SCROLL FOR NEXT