six terrorist enters india tamilnadu through sri lanka planning terrorist attack 
देश

भारतात घुसले दहशतवादी; अतीदक्षतेचा इशारा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: पाकिस्तानमधील लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे सहा दहशतवादी सागरी मार्गाने भारतात घुसल्याची माहिती समोर आली असून, गुप्तचर यंत्रणांनी देशभरात अतीदक्षतेचा इशारा दिला आहे.

श्रीलंकेमार्गे हे दहशतवादी तामिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये आल्याची माहिती  गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे. तामिळनाडूमध्ये पोलिसांना काही संशयित घातपात घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गुरूवारी (ता. 22) रात्री साडेअकराच्या सुमारास पोलिस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांना हा अलर्ट पाठवण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतात शिरलेल्या दहशतवाद्यांमध्ये एक पाकिस्तानी आणि पाच श्रीलंकेतील तमिळ मुस्लीम दहशतवादी आहेत. त्यांनी हिंदूंचा पेहराव केला असून, ते राज्यभरात दहशतवादी कारवायांच्या तयारीत असल्याचे म्हटले आहे. दहशतवादी संरक्षण संस्था, मंदिरं, पर्यटन स्थळावर हल्ला करू शकतात, अशी शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. किनारपट्टी भागात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, मच्छिमारांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दहशतवाद्यांची माहिती मिळवण्यासाठी सर्व जिल्ह्यांच्या आणि किनारपट्टीच्या भागातील यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या आहेत. शिवाय, अधिकाऱ्यांना फेरी आणि बोटींच्या जाण्यायेण्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, भारतामध्ये यापूर्वी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हसेज इंटेलिजेंसच्या (आयएसआय) एका एजंटसह चार दहशतवादी शिरल्याची माहिती समोर आली होती. गुप्तचर यंत्रणांनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवताना 9 ऑगस्ट रोजी अतीदक्षतेचा इशारा दिला होता. पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेमार्फत समर्थन मिळणारे दहशतवाद्यांचे गट जम्मू-काश्मीर आणि अन्य ठिकाणी दहशतवादी कारवाया करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: पुण्यात निवडणुकीचा नवा पॅटर्न; 'हे' तीन पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार

Video: धुरंधरच्या गाण्यावर पाकिस्तानी महिला पोलिसाचा तुफान डान्स; वर्दीवरचा व्हिडीओ व्हायरल

BMC Election: स्थगितीच्या सावलीत उमेदवारी! उघड नाराजी, तरी बॅकडोअर एन्ट्री! भाजपचा थरवळांसाठी खास डाव

BMC Election: 'आश्वासनं फसवी ठरली...'! डबेवाला संघटनेची उद्धव ठाकरेंवर नाराजी; महायुतीला पाठिंबा देत सत्ता बदलाचा इशारा

Latest Marathi News Live Update : ४२ लाखांहून अधिक बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

SCROLL FOR NEXT