Crime News Esakal
देश

Crime News: नात्यानं भाऊ असणाऱ्या ६ जणांचा 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 6 जणांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुरुग्रामला लागून असलेल्या सोहना इथे ही घटना घडली आहे. जीवे मारण्याची धमकी देत, एका १४ वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्व आरोपी सध्या फरार आहेत. आरोपींनी ओळखू येऊ नये म्हणून आपले तोंड बांधले होते.

पोलिसांनी कलम ३६३ आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा आला आहे. सध्या पिडीत मुलीची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. आरोपी हे मुलीचे नात्याने भाऊ लागतात, अशी प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 14 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरातील इतर सदस्य बाहेरगावी गेले होते. पिडीता लहान भावंडांसोबत घरी एकटीच होती. दरम्यान, अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता असल्याचे लक्षात येताच पिडीतेच्या काकाने शोधाशोध सुरू केली.

काही वेळातच घरासमोर बांधकाम सुरू असलेल्या घराचे गेट उघडे असल्याचे त्यांना दिसले. तिथून काही मुलं धावत बाहेर आली. त्याचवेळी त्यांच्या पिडीत मुलगीही रडत घराबाहेर आली. काकांनी विचारल्यानंतर पिडीत मुलीने सांगितले की, पाच तरुणांनी तिला जबरदस्तीने घरातून उचलून, समोरील घरात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. मुलीने ओरडण्यास सुरुवात केल्यावर आरोपीने तिच्या तोंडाला कापड बांधले.

या घटनेनंतर पीडितेला सोहना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचून प्रकरणाचा तपास सुरू केला. डीसीपी दक्षिण सिद्धांत जैन यांनी सांगितले की, सामूहिक बलात्काराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. लवकरच आरोपींनाही अटक करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT