Skymet has forecast 103 percent rainfall this year
Skymet has forecast 103 percent rainfall this year 
देश

सलग तिसऱ्यावर्षी देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार; स्कायमेट’चा अंदाज

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे : देशात जून ते सप्टेंबर या मॉन्सूनच्या काळात पाऊस सामान्य राहण्याचा अंदाज आहे. यंदा सरासरीच्या तुलनेत पाऊस १०३ टक्के इतका राहण्याचा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी संस्थेने वर्तवला आहे. यामध्ये पाच टक्के कमीअधिक तफावत आढळून येण्याची शक्यता आहे. स्कायमेट या संस्थेने जाहीर केलेल्या माहितीनुसार जूनमध्ये चांगला पाऊस पडेल आणि मुंबईत मॉन्सून वेळेत दाखल होईल. सरासरी ८८०.६ मिलिमीटर पाऊस पडला तर तो सामान्य पाऊस असे गृहीत धरले जाते. मात्र, स्कायमेटचा अंदाजानुसार देशात यंदा ९०७ मिलिमीटर इतका पाऊस पडेल. हा अंदाज खरा ठरला तर सलग तिसऱ्या वर्षी देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल.

यंदा जुलैमध्ये महाराष्ट्रासह छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेशात चांगला पाऊस पडणार आहे. तर पूर्वेकडील भागात आणि कर्नाटकामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये मध्य प्रदेश आणि देशाच्या पश्चिम भागात चांगल्या पावसाची
शक्यता आहे.

राज्यात लग्न समारंभासाठी नियमात बदल; इतर कार्यक्रमांसाठी कसे आहेत निर्बंध?

पावसाचा अंदाज
महिना --- पाऊस(मिलिमीटर) -- टक्केवारी
जून -- १६६.९ -- १०६
जुलै -- २८९.० -- ९७
ऑगस्ट -- २५८.२ -- ९९
सप्टेंबर -- १७०.२ -- ११६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT