Narayan Rane_Smriti Irani 
देश

स्मृती इराणींचं राणे प्रकरणावर भाष्य; म्हणाल्या...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आक्षेपार्ह विधान केल्यानं नारायण राणेंना झाली अटक

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राज्यात दिवसभरात घडलेल्या राणे प्रकरणावर भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात आता राजकीय विकृतपणाचं प्रदर्शन केलं जाईल. घटनात्मक इतिहासातील आजचा दिवस दुःखदायक आहे, असं इराणी यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एका पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह विधान केलं होतं. याचा विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे राज्यात आज दिवसभर पडसाद उमटले. नारायण राणेंविरोधात राज्यात तीन जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल झाले. दरम्यान, शिवसैनिकांनी विविध जिल्ह्यांमध्ये राणेंविरोधात निषेधार्थ हिंसक आंदोलनं केली. काही ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले. दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास नारायण राणे यांना अटक झाली. या अटकेनंतर भाजपचे दिल्लीपर्यंतचे नेत्यांनी यावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिल्या. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा, राज्यातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा आदींचा यात समावेश होता.

दरम्यान, या राणे प्रकरणावर केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, "महाराष्ट्रात जे काही घडले ते सर्व नियमांच्या विरोधात आहे, हे केवळ प्रोटोकॉलच्या सभ्यतेच्याच नव्हे तर कायद्याच्याही विरोधात आहे. अशाच प्रकारे आता महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या विकृतपणाचे प्रदर्शन केले जाईल. आपल्या घटनात्मक इतिहासातील हा एक दुःखद दिवस आहे."

मोदी सरकारने काँग्रेसनं उभ्या केलेल्या सर्व संस्था विकल्याचा आरोप राहुल गांधी यांनी नुकताच केला होता. याला उत्तर देताना स्मृती इराणी म्हणाल्या, "भाजप कार्यकाळात उभारण्यात आलेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारनं ८००० कोटी रुपये कमावले आहेत. मग आता राहुल गांधी महाराष्ट्र सरकारनं महामार्ग विकल्याचा आरोप करणार का?"

कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली अशी कमाई करणारी राज्य सरकारं आपली राज्ये विकत आहेत, यावर राहुल गांधींचा विश्वास आहे का? या माणसाचं राजकारण ढोंगीपणापासून सुरू होतं, अहंकारानं टिकतं आणि तिरस्कारानं संपतं, अशा शब्दांत इराणी यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, T20I: 'तू काय करतोय यार ईशान...', अभिषेक शर्मा थर्ड अंपायर निर्णय देत असताना का वैतागला? Video Viral

25 वर्षांनंतर पुन्हा गाजणार 'लगान'; आमिर खानसाठी परदेशात होणार खास सन्मान

Latest Marathi News Live Update : चर्चगेट रेल्वे परिसरात झाड कोसळून तीन वाहनांचे नुकसान; पावसाची संततधार कायम

Solapur News : मी महापालिकेचा अधिकारी, तुमचं बांधकाम थांबणार नाही; सहाय्यक अभियंताच बनला ठेकेदार, ६० लाखांचं घेतलं कंत्राट

Chandrapur Crime : नवजात बाळाच्या विक्री प्रकरणी राजकीय पक्षाच्या २ महिला पदाधिकाऱ्यांना अटक, साक्षीदार म्हणून पुढे आल्या अन् अडकल्या

SCROLL FOR NEXT