Smriti Irani 
देश

Smriti Irani on Udayanidhi: "जोपर्यंत भक्त जिवंत आहेत..."; सनातनविरोधी विधानावरुन स्मृती इराणींचा उदयनिधींना प्रत्युत्तर

सनातन धर्माला विरोध नाही तर त्याचं पूर्णपणे निर्मुलन करायला हवं, असं विधान स्टॅलिन यांनी केलं होतं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : सनातन धर्माविरोधात वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी तामिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. दिल्लीतील कृष्णजन्माष्ठमीच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी उपस्थित भाविकांसमोरच आपली भूमिका स्पष्ट केली. (Smrit Irani slams on Udayanidhi Stalin over the statement against Sanatan Dharma)

स्मृती इराणी काय म्हणाल्या?

स्मृती इराणी म्हणाल्या, "जे सनातन धर्माला आव्हान देत असतील त्यांच्यापर्यंत सर्व भक्तांचा आवाज पोहोचायला हवा. जोपर्यंत एक एक भक्त या पृथ्वीवर जिवंत आहे, तोपर्यंत असा कोणीही नाही की जो धर्माला आव्हान देईल, लोकांच्या आस्थेला आव्हान देईल"

उदयनिधी स्टॅलिन यांनी काय म्हटलं होतं?

विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यक्रमात उदयनिधी म्हणाले होते, "'सनातन धर्माला विरोध नाही तर त्याचं पूर्णपणे निर्मुलन करायला हवं. जसं डेंग्यू, मलेरियाला, कोरोनाला आपण विरोध करत नाही तर ते नष्ट करतो तसेच सनातन धर्माला नष्ट केलं पाहिजे. कारण सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समानतेच्या विरोधात आहे"

भाजपनं केली हिटलरशी तुलना

भाजपनं देखील याच मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘उदयनिधी यांचं वक्तव्य हे द्वेषमूलक स्वरूपाचे असून सनातन धर्माचे पालन करणाऱ्या ८० टक्के लोकांचा वंशच्छेद करण्याचं आवाहनच त्यांनी केलं आहे.

यावरुन उदयनिधी यांची तुलना भाजपनं हिटलरशी केली आहे. काँग्रेस आणि विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी स्टॅलिन यांच्या वक्तव्याचे समर्थन करते का?’ हे त्यांनी स्पष्ट करावे, असं भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT