Smriti Irani Video On Rahul Gandhi Esakal
देश

Smriti Irani Video: "त्यांनी यशाची चव चाखली..." कट्टर विरोधक स्मृती इराणींनी केले राहुल गांधींचे कौतुक; पाहा व्हायरल व्हिडिओ

Smriti Irani Video On Rahul Gandhi: यंदा अमेठीतून स्मृती इराणी यांचा काँग्रेसचे किशोरीलाल शर्मा यांनी 1.67 लाख मतांनी पराभव केला होता.

आशुतोष मसगौंडे

माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या गेल्या 10 वर्षांत राहुल गांधी यांच्या सर्वात मोठ्या टीकाकार राहिल्या आहेत. त्यांनी 2014 मध्ये राहुल यांच्याविरोधात अमेठीतून निवडणूक लढवली होती, पण त्यामध्ये इराणी पराभूत झाल्या होता. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना धूळ चारली होती. यानंतर स्मृती इराणी यांच्या राहुल गांधींविरोधातील टीकेची धार वाढली होती.

अशात आता स्मृती इराणींचा एका पाडकास्टमधील व्हिडिओ व्हायरल होत असून, त्या राहुल गांधींचे कौतुक करत असल्याचे दिसत आहे. त्या म्हणाल्या की, "कोणाला अवडो किंवा नाही राहुल गांधी यांचे राजकारण बदलले आहे." त्या टॉप अँगल या पॉडकास्टमध्ये बोलत होत्या.

राहुल गांधींचे कौतुक

या पॉडकास्टमध्ये स्मृती इराणी यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. दरम्यान राहुल गांधींचा विषय निघाला तेव्हा त्या भरभरून बोलल्या. यावेळी इराणी म्हणाल्या, "मला वाटते की राहुल गांधी यांच्या राजकारणात बदल घडला आहे. त्यांना आता वाटतेय की, त्यांनी यशची चव चाखली आहे. ते संसदेतही टी शर्ट घालतात. यातून त्यांना देशातील तरुणांना संदेश द्यायचाय. त्यामुळे त्यांचे कोणतेही पाऊल तुम्हाला चांगले किंवा वाईट वाटू शकते या गैरसमजात आपण राहू नये. ते तुम्हाला बालिश वाटेल... पण, ते आता वेगळे राजकारण करत आहेत.

स्मृती इराणींनी यंदा अमेठी गमावली

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने काठावरचे बहुमत मिळवत तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. मात्र, उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीने केलेल्या दमदार कामगिरीमुळे इराणी यांना अमेठीतून पराभूत व्हावे लागले. यावेळी काँग्रेसचे किशोरीलाल शर्मा यांनी त्यांचा 1.67 लाख मतांनी विजय मिळवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT