maneka gandhi  
देश

"गाढवाच्या दुधापासून बनवलेला साबण स्त्रीचे शरीर सुंदर ठेवतो"; भाजप MP मनेका गांधींचा दावा

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार मनेका गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये "चौपाल" ला संबोधित करताना खासदार म्हणतात, "गाढवाच्या दुधाचा साबण स्त्रीचे शरीर नेहमीच सुंदर ठेवतो. एक अतिशय प्रसिद्ध विदेशी राणी 'क्लियोपात्रा' होती जी गाढवाच्या दुधाने आंघोळ करायची, असंही त्यांनी म्हटलं.

गाढवाच्या दुधाचा साबण दिल्लीत प्रत्येकी 500 रुपयांना विकला जातोय. आपण शेळीच्या दुधाचा साबण का बनवत नाही. गाढवाच्या दुधाचा साबण बनवा. गाढवाच्या दुधाचा साबण स्त्रीचे शरीर नेहमीच सुंदर ठेवतो, असं मनेका गांधी यांनी म्हटलं.

हा व्हिडिओ बलदिराईमध्ये आयोजित एका कार्यक्रमाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये मेनका गांधी लोकांना सांगत आहेत की त्यांनी गाढवांची संख्या कमी होत असल्याचे पाहिले आहे. यानंतर त्या लोकांना प्रश्न विचारतात की, तुम्हाला गाढव पाहून किती दिवस झाले. गाढव कमी झाले आहेत किंवा संपले आहेत. पण लडाखमध्ये गाढवाचे दूध काढून त्याच्या दुधापासून साबण बनवले जात असल्याचं त्यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: भेसळखोरांनो सावधान! दूध-पनीरनंतर आता मद्यावरही FDA वॉच ठेवणार; उत्पादन, लेबलिंगपासून भेसळीपर्यंत तपासणी होणार

Pune Dam Water : धरणे भरली, अन् चिंता मिटली; जिल्ह्यातील १३ धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक साठा

Pune Metro : पुणे मेट्रो ३ साठी मुहूर्तच मिळेना; सर्व स्थानके कार्यान्वित होऊन मेट्रो धावेपर्यंत मार्च २०२७ उजाडणार

Sadanand Date : पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान वापर करून गुन्ह्यांचा तपास करावा

Nashik earthquake: नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के; 3.8 रिश्टर स्केलची तीव्रता

SCROLL FOR NEXT