Social Media Sakal
देश

काहीजण सोशल मीडियाला नियम नसलेला खेळ समजतात - हायकोर्ट

सोशल मीडियाचा होतोय मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग

Amit Ujagare (अमित उजागरे)

थिरुवअनंतपुरम : सोशल मीडिया (Social Media) हे योग्य हातांसाठी एक चांगलं माध्यम आहे. पण काही जण याला मनमानी पद्धतीनं खेळला जाणारा नियम नसलेला खेळ समजत आहेत. बोलण्याचं स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य (Freedom of speech) हा किंमती अधिकार आहे. पण काही लोक याचा खूपच दुरुपयोग करत आहेत, अशी सडेतोड टिप्पणी केरळ हायकोर्टानं (Kerala High Court) केली आहे. न्या. देवन रामचंद्रन यांनी एका सुनावणीदरम्यान ही टिप्पणी केली. (social media a toy without rules for Some people comment Kerala High Court)

एका माजी न्यायिक अधिकाऱ्यानं केलेल्या सोशल मीडिया पोस्टचा उल्लेख करताना हे भाष्य केलं आहे. प्राचीन वस्तूंचा व्यापारी असलेल्या मोनसन मवंकुल या व्यक्तीच्या चौकशीसंबंधी केरळ हायकोर्टानं दिलेल्या एका आदेशाविरोधात सोशल मीडियावर माजी न्यायिक अधिकाऱ्यानं अपमानजनक आणि तिखट टिप्पणी केली होती.

समन्स जारी केल्यानंतरही अधिकाऱ्याची हजेरी नाही

हायकोर्टानं म्हटलं की, संबंधीत माजी अधिकाऱ्यानं निकाल देणाऱ्या न्यायाधीशांविरोधात वैयक्तीक हल्ले देखील केले होते. या अधिकाऱ्याविरोधात कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई सुरु करण्यापूर्वी त्यानं कोर्टात येऊन आपण काय चुकीचा निकाल दिला होता हे सांगावं असंही म्हटलं होतं. पण तो अधिकारी कोर्टात हजर झाला नाही. त्यामुळं कोर्टानं या अधिकाऱ्याला भेकड असं संबोधलं. न्या. रामचंद्रन यांनी म्हटलं की, आजच्या घडीचं विडंबन हे आहे की, व्यक्त असलेल्या लोकांना असं वाटतं की, ते सोशल मीडियावर कोणत्याही विषयावर खूपच कठोर शब्दात टिप्पणी करु शकतात. मनमानी विधानं करु शकतात आणि यासाठी त्यांना कोणालाही उत्तर द्यावं लागणार नाही.

हायकोर्टानं पुढं म्हटलं की, सोशल मीडिया चांगल्या आणि योग्य लोकांच्या हातात असणं चांगलं आहे. पण काहीजणांसाठी हा निरंकुश भावनांना व्यक्त करण्यासाठी नियम नसल्याचं खेळाचं मैदान सुरु आहे. हायकोर्टानं माजी न्यायिक अधिकाऱ्याला जेव्हा कोर्टात हजर राहण्यास सांगितलं तेव्हा संबंधित अधिकाऱ्यानं पुन्हा कोर्टाची खिल्ली उडवत हा प्रकार फॅसिस्ट असल्याचं म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Crime : माजी महिला सरपंचासह सासऱ्यांना घरात घुसून मारलं; इचलकरंजीलगत असलेल्या गावात धक्कादायक घटना, कारण ऐकून वाटेल आश्चर्य

PM Kisan 24th Installment 2026 : पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्ताची प्रतीक्षा संपली! 30 ऑक्टोबरला जमा होणार 2000 रुपये? खात्यात पैसे येण्यापूर्वी लगेच करा 'हे' काम

KBC Marathi: तू चूक मान्य केलीस म्हटल्यावर... गौतमी पाटीलने माधुरी दीक्षित समोर दिली त्या गोष्टीची कबुली; अभिनेत्री म्हणाली-

Latest Marathi News Live Update : ऑडिओ क्लिप आरोपावर मनोज जरांगे यांची रामदास कदमांवर टीका

Drought Relief: नो टॅग नो क्लेम ;जनावरांच्या टॅगिंग अभावी दुष्काळात पशुपालक मदतीपासून वंचित राहण्याची भीती

SCROLL FOR NEXT