social media also shares their emotions with k sivan for Chandrayaan 2
social media also shares their emotions with k sivan for Chandrayaan 2 
देश

Chandrayaan 2 : के. सिवन यांच्यासह सारा देश हळहळला!

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : चांद्रभूमीपासून 2.1 किलोमीटर अंतरावर असताना 'चांद्रयान 2'मधील विक्रम लॅंडरचा इस्रो'च्या मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला आणि भारताच्या चांद्रमोहिमेला मोठा धक्का बसला. या अपयशानंतर इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेवर केवळ इस्रोच नाही तर, सगळा देश हळहळला.

आज (ता. 7) सकाळी मोदी इस्त्रो मुख्यालयात शास्त्रज्ञांना संबोधित केल्यानतर सिवन यांनी मोदींच्या खांद्यावर डोके ठेवून अश्रूंना वाट करून दिली, तर मोदींनीही त्यांचे सांत्वन केले.

चंद्रावर सुखरूप उतरण्याचे भारताचे स्वप्न शनिवारी पहाटे भंग पावले. 'इस्रो'च्या बंगळूर येथील मुख्यालयात आज (शनिवार) सकाळी मोदींनी पुन्हा एकदा शास्त्रज्ञांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शास्त्रज्ञांना प्रेरणा देत देश तुमच्या पाठिशी असल्याचे सांगितले. मोदी म्हणाले, की आपण काही अडचणींमुळे चंद्रावर पोहचू शकलो नाही. पण, रात्रंदिवस काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचे कौतुक आहे. देश इस्त्रोच्या पाठिशी आहे. अडचणी आल्या तरी हिंमत हारू नका. हे कसे झाले, कशामुळे झाले असे अनेक प्रश्न होते. आज काही अडचणी आल्या असतील. पण, आपले धैर्य कमी झालेले नाही. आता आपण आणखी कणखर झालेलो आहोत.

यानंतर मोदींनी इस्त्रोच्या मुख्यालयातून बाहेर पडत असताना सर्व शास्त्रज्ञांची भेट घेऊन त्यांचे मनोधैर्य वाढविले. तेव्हा के. सिवन यांना अश्रू अनावर झाले. मोदींच्या खांद्यावर डोके ठेवून त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. मोदींनीही त्यांची पाठ थोपटून त्यांचे सांत्वन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT