Socialist Party Uttar Pradesh Budget session Legislative Assembly from today Azam Khan Akhilesh Yadav Shivpal Singh sakal
देश

आझम, शिवपाल यांची बैठकीकडे पाठ

उत्तर प्रदेश : विधानसभेचे आजपासून अर्थसंकल्पी अधिवेशन

सकाळ वृत्तसेवा

लखनौ : समाजवादी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीकडे वरिष्ठ आमदार आझम खान आणि नाराज नेते तसेच पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांचे काका शिवपाल सिंह यांनी रविवारी पाठच फिरविली. उत्तर प्रदेश विधानसभेच्या सोमवारपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. आझम यांनी शुक्रवारी तुरुंगातून सुटका झाली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. ते प्रकृतीच्या कारणावरून अनुपस्थित राहिल्याचे एका नेत्याने सांगितले, मात्र आझम मुलगा अब्दुल्ला याच्यासह रामपूर दौऱ्यावर गेल्याचे दिसून आले.

वेगवेगळ्या गुन्ह्यांत गजाआड असलेल्या समर्थकांना ते भेटणार आहेत. अखिलेश यांनी आझम तसेच मुस्लिम समाजाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आझम यांच्या समर्थकांनी अलीकडेच केला होता. शिवपाल यांनी अखिलेश यांच्याबरोबरील मतभेद कायम राहिल्यामुळे आधीच्या बैठकीलाही हजेरी लावली नव्हती. शिवपाल यांनी २०१७च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अखिलेश पक्षाबरोबर फारकत घेतली होती. त्यांनी प्रगतिशील समाजवादी पक्ष (लोहिया) हा नवा पक्ष काढला. यावेळची निवडणूक मात्र त्यांनी सपच्या चिन्हावर लढविली होती. दरम्यान, सपचे आमदार रविदास मेहरोत्रा यांनी सांगितले की, आझम आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला सोमवारी अधिवेशनाला उपस्थित राहतील.

आझम हे अखिलेश यांच्या डाव्या बाजूला बसून मुद्दे मांडतील. आधी ते सदस्यत्वाची शपथ घेतील. शिवपाल यांच्याबद्दल ते म्हणाले की, याआधीही ते एका बैठकीला आले नव्हते. या बैठकीत अखिलेश यांनी आमदारांना मार्गदर्शन केले.

आझम यांची नाराजी उघड

आझम यांनी तुरुंगात असताना पक्षाचे आमदार रविदास मेहरोत्रा यांची भेट घेतली नव्हती. त्यानंतर मात्र ते काँग्रेस नेते प्रमोद कृष्णन यांना भेटले होते. त्यामुळे ते सपवर नाराज असल्याचे उघड झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

Ratnagiri : देव तारी त्याला कोण मारी! पुण्यातील पर्यटक समुद्रात वाहून जात होता..., स्थानिकांनी प्रसंगावधानामुळे वाचला; थरारक क्षण

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT