देश

एका खड्डयाने सारं संपवलं, इंजिनिअरचा मनाला चटका लावणारा शेवट

अनेकदा हे खड्डे जीवावर सुद्धा बेततात. या खड्ड्यांमुळे देशाच्या वेगवेगळ्या भागात अनेक दुचाकीस्वारांनी (Biker) आपले प्राण गमावले आहेत.

दीनानाथ परब

चेन्नई: रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे (Pothole) शारीरिक त्रास, वाहतूक कोंडी, प्रवासाची वेळ लांबणे या समस्या, तर निर्माण होतातच. पण त्याचबरोबर अनेकदा हे खड्डे जीवावर सुद्धा बेततात. या खड्ड्यांमुळे देशाच्या वेगवेगळ्या भागात अनेक दुचाकीस्वारांनी (Biker) आपले प्राण गमावले आहेत. सोमवारी तामिळनाडू चेन्नईमध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचा रस्त्यावरच्या छोट्याशा खड्डयाने बळी घेतला.

मोहम्मद युनूस कट्टुकाची जाफर अली असे मृत इंजिनिअरचे नाव आहे. तो ३२ वर्षांचा होता. मोहम्मद युनूस कामावर जात असताना चिन्नमलाई जवळच्या रस्त्यावर एक खड्डा पडला होता. मोहम्मद युनूसची बाईक पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्डयामध्ये गेल्यानंतर त्याला तोल सावरता आला नाही. त्याच्या डाव्या बाजूला बस होती. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

तोल सावरता न आल्याने मोहम्मद युनूस बसच्या चाकाखाली गेला. बस त्याच्या डोक्यावरुन गेली. मोहम्मद युनूसचा जागेवरच मृत्यू झाला. हा संपर्ण अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या गिंडी पोलिसांनी मोहम्मद युनूसचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या अपघातानंतर लगेच तो खड्डा बुजवण्यात आला. पण प्रशासनाच्या चुकीमुळे एका निष्पाप इंजिनिअरला आपल्या प्राणांना मुकावे लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यपाल कर्नाटकात नाहीत, सिद्धरामय्या राजीनामा कुणाकडे देणार? नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कसा होणार?

IPL 2027 मध्ये राहुल द्रविड CSK चा मुख्य प्रशिक्षक, स्टीफन फ्लेमिंगची हकालपट्टी? फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स...

Bakri Eid: बकऱ्याचा अजब 'डाएट प्लॅन'! रोज २५० ग्रॅम चिकन आणि कोल्ड्रिंक; AC त राहणाऱ्या काश्मिरी बकऱ्याची गोष्ट

8th Pay Commission: : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार 4 पट वाढणार? रेल्वे युनियनचा मोठा प्रस्ताव; कोणाचा पगार किती वाढणार?

FACT CHECK : वैभव सूर्यवंशीला Mumbai Indians कडून ३० कोटींची ऑफर; ललित मोदीने सत्य समोर आणलं, नेमकं काय सुरूय?

SCROLL FOR NEXT