soldier chandu chavan 
देश

जवान चंदू चव्हाण यांचे जंतर-मंतरवर उपोषण

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या तावडीमधून सहीसलामत सुटून भारतात परतलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांनी आजपासून (शनिवार) नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे.

चंदू चव्हाण यांच्या आंदोलनाला माजी सैनिक तेजबहादूर यादव यांच्यासह विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

चंदू चव्हाण म्हणाले, 'पाकिस्तानातून सुटून आल्यानंतर भारतीय लष्कराची माझ्याशी असलेली वागणूक, वर्तन बदलले. त्यामुळे मी व्यथित झालो. तीन वर्षांपासून मी या समस्येला सामोरा जात आहे. लष्करातील अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिला. पाकिस्तानमधून परतल्यापासून सतत चौकशीला सामोरा जात असून, 90 दिवसांची शिक्षा भोगली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून वेतन नसल्यामुळे आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. मोबाईल व ओळखपत्र जप्त केले आहे. विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसत आहे. माझ्यावर झालेल्या कारवाईची सरकारने सीबीआयने चौकशी करावी व मला न्याय मिळवून द्यावा.'

दरम्यान, चंदू चव्हाण हे भारतीय नियंत्रण सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेले होते. पाकिस्तानच्या तावडीत 3 महिने 21 दिवस होते. त्यावेळी त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. केंद्र सरकारने मोठे प्रयत्न करतत्यांना भारतात आणले होते. चंदू भारतात परतले त्यावेळी देशवासीयांनी मोठा जल्लोष केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: सामन्यात १० विकेट्स, तरी मानव सुथारला POM चा पुरस्कार नाही! कोण ठरला सर्वोत्तम खेळाडू अन् का?

Nagpur Muddy Road: दीड वर्षातच पांदण रस्त्याची ‘माती’; देवमुंढरीचा रस्ता चिखलमय; दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा

MPSC Success Story: ‘गावच्या मातीतून प्रशासकीय सेवेत झेप’! गायत्री देशमुखची जिद्द, मेहनतीने MPSC मध्ये दमदार कामगिरी, मुलींमध्ये राज्यात दुसरी

Pune Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात; ५ ते ६ वाहनांची धडक, रिक्षाचालक गंभीर

Kachewani Navegaon Road Accidents: ८९ अपघात, ४० बळी; काचेवानी-नवेगाव खुर्द मार्ग ‘मृत्यूचा महामार्ग’

SCROLL FOR NEXT