son put in bed box and ran away with lover child died at chandigarh 
देश

प्रियकरासोबत मजा अन् बाळाची शेवटची घटका...

वृत्तसंस्था

चंदीगड: प्रियकरासोबत ती मजा करत असताना दुसरीकडे तिचेच बाळ शेवटची घटका मोजत होते. अखेर श्वास कोंडल्यामुळे अडीच वर्षाच्या मुलाने जगाचा निरोप घेतला. माता न तूं, वैरिणी... या म्हणीचा प्रत्येय येथे आला आहे.

मातेनेच आपल्या चिमुकल्याचा जीव घेतल्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेक्टर-45 मध्ये राहात असलेल्या महिलेचे एकासोबत प्रेमसंबंध होते. प्रियकरासोबत पळून जाण्यापूर्वी तिने आपल्या अडीच वर्षाच्या मुलाला एका बॉक्समध्ये बांधून ठेवले. मुलाला बॉक्समध्ये बंद केल्यानंतर ती प्रियकरासोबत पळून गेली. पती रात्री नऊच्या सुमारास घरी आला. त्यावेळी त्याला पत्नी आणि मुलगा दिसला नाही. दशरथ यांनी पत्नी रुपाला फोन केला. यावेळी तिने आपण पळून आले असून, मुलाला घरामध्ये कोंडून ठेवल्याचे सांगितले. दशरथ यांनी तत्काळ बॉक्स उघडून पाहिला. पण, त्यावेळी मुलाचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, दशरथ यांनी पत्नी विरोधात तक्रार दाखल केली. ऑक्सिजन अभावी मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती अहवालातून पुढे आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT