Sonali Phogat Murder Case Sakal
देश

Sonali Phogat Case : हत्येचा तपास CBI करणार, गोवा सरकारचा मोठा निर्णय

या प्रकरणी सोनाली फोगाट यांची कन्या यशोधरा फोगट यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते.

सकाळ डिजिटल टीम

Sonali Phogat Case : सोनाली फोगाट खून प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. सोनाली फोगट खून प्रकरण आता सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय गोवा पोलिसांनी घेतला आहे. या प्रकरणी सोनाली फोगट यांची कन्या यशोधरा फोगाट यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून याप्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता या हत्याप्रकणाचा तपास सीबीआयतर्फे करण्यात येणार आहे.

सोनाली फोगाट यांचा ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळे मृत्यू

ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळे सोनाली फोगट यांचा मृत्यू झाला असल्याचे गोवा पोलिसांनी म्हटले आहे. सोनाली यांनी गोव्यात पोहोचल्यानंतर थांबलेल्या हॉटेलातच जेवण केले होते. 22 ऑगस्ट रोजी रात्री ती पहिल्यांदा त्या रिसॉर्टबाहेर आल्या होत्या. त्यांनी कर्लीज रेस्टॉरंटमध्ये डिनर केला होता. त्यानंतर त्याच रात्री त्यांचा मृत्यू झाला होता.

फोगाट यांचा स्वीय सहायक सुधीर सांगवान आणि सचिव सुखविंदर सिंग पाल यांना आता या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपीने हणजूण येथील रेस्टॉरंटमधील पिण्याच्या पाण्यात विषारी पदार्थ मिसळल्याची कबुली दिली आहे.

आरोपीने हे कृत्य का केले याबाबत खुलासा करताना संशयित आरोपींनी सोनाली फोगाट यांची मालमत्ता, आर्थिक संपत्ती हडपणे तसेच त्यांची राजकीय कारकीर्द संपवण्याच्या उद्देशाने या दोघांनी सोनाली यांची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

यशोधराचा जीव धोक्यात?

दरम्यान, सोनाली फोगाट यांच्या हत्येनंतर संपूर्ण मालमत्तेची वारसदार यशोधारा याच असणार आहेत. त्यामुळे अशा परिस्थीती यशोधारा यांच्या जीवाला धोका असल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित कुटुंबियांनी यशोधारा यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT