Sonali Phogat esakal
देश

सोनाली फोगाटच्या मर्डरचा कट आधीच रचला; आरोपीचा मोठा खुलासा

सकाळ डिजिटल टीम

पणजी : भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगाट हिची गोव्यात हत्या करण्यात आल्याचं समोर आलं असून यासंदर्भात आरोपी सुधीर संगवान याने मोठा खुलासा केला आहे. गोव्यातील एका हॉटेलमध्ये तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर तिच्यासोबत असलेल्या संगवान याला गोवा पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.

(Sonali Phogat Murder Case Latest Updates)

सोनाली फोगाट हिच्या हत्येची कबुली आरोपी सुधीर सांगवान याने दिली असून तिच्या हत्येचा कट आधीच रचला असल्याचं त्याने चौकशीदरम्यान सांगितलं आहे. सोनालीला शुटींग असल्याचं खोटं सांगत गोव्याला घेऊन आले आणि तिची हत्या करण्यात आल्याची माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, सोनाली फोगाट यांचे काही फुटेज गोवा पोलिसांच्या हाती लागले होते. यावेळी त्यांनी ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे सोनाली यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला असं सांगितलं होतं. त्यानंतर, आता सीसीटीव्हीचे काही फुटेज समोर आले होते. त्यामध्ये त्यांना जबरदस्तीने मद्यपान देण्यात येत असल्याचा तर्क लावण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, तपास अधिकाऱ्याने संबंधित आवारातील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग तपासले आणि असे आढळून आले की, सुधीर सोनालीला पाण्याची बाटली पिण्यास भाग पाडत होता. या सर्व प्रकारानंतर सुधीर संगवान या आरोपीने चौकशीत हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्याचबरोबर या हत्येचा कट खूप दिवसांपूर्वी रचला होता असं आरोपींनी गोवा पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

Successful Investment: बाबो! ही महिला चक्क पार्किंगमधून कमावते लाखो रुपये; नेमका काय आहे बिझनेस?

अंतराळात तयार होणार स्कॉच व्हिस्की! कुणाला प्यायला मिळणार? ‘स्पेस पफिन’ मिशन नेमकं काय?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

FDA Action: खाद्यतेलाच्या साठ्यांवर छापा, 'एफडीए'च्या कारवाईत १.२८ कोटींचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT