Sonia Duhan resignation from NCP-SCP esakal
देश

Sonia Duhan: सेल्फी काढून पक्ष चालत नाही.. सोनिया दुहानचा शरद पवार गटाला रामराम, सुप्रिया सुळेंवर काय केलेत आरोप?

Sonia Duhan: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे मतदान होऊन सात दिवस उलटले तरी नेत्यांनी पक्ष सोडण्याचा ट्रेंड सुरूच आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सोनिया दुहान यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

Sandip Kapde

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गट विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा सोनिया दुहान यांनी पक्ष सोडल्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर हल्लाबोल केला. पक्षात सर्व काही सुरळीत नाही…सुप्रिया सुळेंमुळे मी पक्ष सोडत असल्याचे सोनिया दुहान यांनी सांगितेल. लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी शरद पवार गटला मोठा झटका बसला आहे.

सोनिया दुहान म्हणाल्या, "मी शरद पवार यांना सोडलेले नाही आणि मी पक्ष सोडलेला नाही... या अफवा कोण पसरवत आहे हे मला माहीत नाही…. मी अजितदादांच्या पक्षात गेलेले नाही. शरद पवार यांच्याशी अनेक दशके जोडलेले नेते पक्ष का सोडत आहेत. याचा विचार सुप्रिया सुळेंनी करायला हवा… पक्षात सर्व काही सुरळीत चालत नाही… सुप्रिया सुळेंमुळे मला पक्ष सोडावा लागत आहे."

शरद पवार यांच्या आजूबाजूला कोणते वातावरण निर्माण केले जात आहे की सर्व नेते सोडून जात आहेत, याचा सुप्रिया सुळे यांनी विचार करावा. आमच्यासारखे लोक सोडून जात असतील तर पक्षात काही सुरळीत सुरु नाही. कोणत्याही नेत्यावर आमची नाराजी नाही. फक्त सुप्रिया सुळेंवर आम्ही नाराज आहोत. आता बस झालं, असं सोनिया दुहान म्हणाल्या.

सोनिया दुहान म्हणाले, कोणत्याही गोष्टीला आपण दुर्लक्षित करतो. ते गोष्ट एकदीवस बाहेर येते. त्यामुळे आज सयंम संपला आहे. आम्ही शरद पवार यांच्यासोबत बोललो देखील आहे. त्यांनी समजून सांगितले. आमची बैठक देखील होणार होती. २२ तारखेला शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी मला सुप्रिया सुळे यांचा फोन आला. त्या ज्या पद्धतीने बोलल्या ते ऐकूण मला पक्षात राहायचे नाही.

आता नंतर राजकारण नंतर बघू, करिअर नंतर बघू, पक्षात राहावे, अशी परिस्थितीच सध्या नाही आहे. सेल्फी काढून पक्ष चालत नाही. पक्षाला पक्षाच्या नियमानुसार चालवावे लागते. ही गोष्टी सुप्रिया सुळे आणि त्यांच्या आजुबाजुच्या नेत्यांना समजून घ्यावी लागले. मी पक्ष सोडत आहे, मी जाहीरपणे सांगतो की सुप्रिया सुळे यांच्यामुळे मी पक्ष सोडत आहे. धिरज शर्माने देखील सुप्रिया सुळेंमुळे पक्ष सोडला, असे सोनिया दुहान यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Tragic Diwali : दुर्दैवी! ऐन दिवाळीत अपघातांची मालिकाच, कोल्हापुरात एका दिवसात ४ जणांचा अपघाती मृत्यू

India vs Australia 2nd ODI : रोहित शर्माला शेवटची संधी? गौतम गंभीरचा प्लॅन बी तयार; युवा खेळाडूकडून करून घेतला कसून सराव...

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये टवाळखोरांचा धुडगूस, वाहनांची केली तोडफोड

Pune Air Pollution : पुण्यात यंदा दिवाळीला मागील वर्षी पेक्षा प्रदूषण कमी, हवेची गुणवत्ता सुधारली; नागरिकांना काही प्रमाणात दिलासा

Kolhapur Accident : ‘मामा... असं कसं झालं हो..!, कोणावरही वेळ येऊ नये अशी कांबळे कुटुंबावर आली; भाच्याने फोडलेला टाहो काळीज फाडणारा...

SCROLL FOR NEXT