Sonia Gandhi Birthday esakal
देश

Sonia Gandhi Birthday : क्षुल्लक गोष्ट कारणीभूत ठरली आणि सोनिया अन् बिग बींमध्ये निर्माण झाला दुरावा

नातं एवढं बिघडण्यामागे नेमकं असं काय घडलं याविषयी बऱ्याच लोकांना उत्सुकता असते.

सकाळ डिजिटल टीम

Gandhi and Bachchan Family dispute : गांधी आणि बच्चन कुटुंबिय यांचे एकमेकांशी मित्रच नाही तर कौटुंबिक संबंध होते. पण नंतर त्यांच्यात असं काही झालं की, ते एकमेकांचं तोंड बघेनासे झाले. नातं एवढं बिघडण्यामागे नेमकं असं काय घडलं याविषयी बऱ्याच लोकांना उत्सुकता असते.

याविषयीचा किस्सा 'Bhartiya's book व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर, सोनिया गांधी और में' या ज्येष्ठ पत्रकार आणि माजी एम. पी. संतोष यांच्या पुस्तकात सांगण्यात आला आहे. त्यातून समजतं की, एका लहानशा कारणावरून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. एक मदत सोनिया यांनी अमिताभ बच्चन यांच्याकडे मागितली, पण ती त्यांनी न दिल्याने सोनिया गांधी फार दुखावल्या गेल्या.

काय आहे किस्सा?

राहुल गांधी परदेशात शिकायला असताना, त्यांची फी भरण्यासाठी म्हणून सोनिया यांनी अमिताभ बच्चन यांना मदत मागितली होती. त्यावेळी उत्तरात बच्चन म्हणाले की, "ललित सुरी आणि सतीश शर्मा यांनी पैशांचा घोटाळा केला आहे. काहीही उरलेलं नाही. तरीही मी काहीतरी करतो." त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी एक हजार डॉलर्सचा चेक सोनियांना पाठवला. पण सोनिया गांधी खूप दुखावल्या होत्या. त्यांनी चेक नाकारला आणि बच्चन कुटुंबियांशी संबंध तोडले.

पण या घटनेला आधीच्या बऱ्याच घटनांची पार्श्वभूमी होती. ज्यामुळे या कुटुंबांच्या नात्यात कटुता आणि अविश्वास वाढण्यास सुरूवात झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अर्शदीप सिंगने निवडले भारताचे सर्वोत्तम ५ बॉलर, पण बुमराहकडे दुर्लक्ष! प्लेइंग इलेव्हनमध्ये गंभीरला दिली जागा

Crime: पोटच्या मुलीसोबत नको ते केलं; रागाच्या भरात प्रेयसीनं प्रियकराचं गुप्तांग कापलं नंतर..., नेमकं काय घडलं?

Delhi Capitals: IPL 2027 आधी मुंबईच्या ४ युवा खेळाडूंना मोठी संधी; दिल्ली कॅपिटल्सच्या ट्रायल्समध्ये गांगुली-युवराज घेणार कसोटी!

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कन्या शकुंतलाबाई सपताल यांचे निधन

भाजपचा बालेकिल्ला सर केला! प्रशांत किशोरांचा विजय कसा शक्य झाला? विजयामागची 5 मोठी कारणं

SCROLL FOR NEXT