देश

अझहरच्या सुटकेची कल्पना सोनिया गांधींनाही : अमित शहा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कुख्यात दहशतवादी आणि जैश-ए-महंम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरच्या सुटकेवरून काँग्रेसकडून भाजपवर टीकास्त्र सोडले जात आहे. त्यानंतर आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि मनमोहनसिंगही उपस्थित होते.

अमित शहा यांनी आपल्या ब्लॉगमधून काही गोष्टींची आठवण करुन दिली. यामध्ये विमान अपहरणाच्या घटनेनंतर वाजपेयी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग या दोन्ही नेत्यांनी उपस्थिती लावली होती. सर्वपक्षांनी मिळून मसूद अझहरची सुटका करावी आणि प्रवाशांना परत आणावे, असा निर्णय देशाच्या भावनेचा विचार करुन घेण्यात आला. त्यावेळी हा निर्णय घेण्याशिवाय आणखी दुसरा कोणताही पर्यायही नव्हता, असे शहा यांनी सांगितले.

दरम्यान, ओलीस ठेवलेल्या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची होती. मसूद अझहरची सुटका का केली? असा प्रश्न राहुल गांधी यांच्याकडून केला जात आहे. त्यावरून राहुल गांधी देशाची दिशाभूल करत आहेत, असेही अमित शहा यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT