Sonia Gandhi esakal
देश

Sonia Gandhi : सोनिया गांधी उद्या राज्यसभेसाठी अर्ज भरणार? 'इथून' दाखल करणार उमेदवारी

काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती येत आहे. त्या जयपूर येथून उमेदवारी दाखल करणार असल्याचं सांगण्यात येतंय.

संतोष कानडे

नवी दिल्लीः काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती येत आहे. त्या जयपूर येथून उमेदवारी दाखल करणार असल्याचं सांगण्यात येतंय.

'एएनआय'ने सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी बुधवारी जयपूर येथून राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल करणार आहेत, असं ट्वीट करण्यात आलेलं आहे.

राज्यसभेच्या ५६ जागांसाठी येत्या २७ तारखेला मतदान होणार आहे. यात उत्तर प्रदेशातील सर्वाधिक दहा जागा असून त्यापाठोपाठ महाराष्ट्र आणि बिहारमधील प्रत्येकी सहा जागांचा समावेश आहे.

भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) २९ जानेवारी रोजी अधिसूचना जारी करून राज्यसभेच्या निवडणूका जाहीर केल्या आहेत. 13 राज्यांतील 50 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपणार आहे, तर दोन राज्यांतील उर्वरित सहा सदस्य 3 एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. त्या ठिकाणच्या निवडणुका २७ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रातील एकूण ६ खासदारांचा कार्यकाळ २ एप्रिलला संपणार आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे, काँग्रेसचे खासदार कुमार केतकर, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, भाजपचे खासदार श्री. व्ही. मुरलीधरन, राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण या खासदारांचाही समावेश यामध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात सुरु होणार ५ नवीन न्यायालयं, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

Vaibhav Sooryavanshi All Records: वैभव सूर्यवंशीने गेल्या वर्षभरात मोडलेत ९ वर्ल्ड रेकॉर्ड्स! जाणून घ्या एका क्लिकवर.. तुम्हाला यातले किती माहित होते?

Pune Crime: पुण्यात धक्कादायक! दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्यांना जाब विचारला, काका-पुतण्यावर जीवघेणा हल्ला

Latest Live Updates Marathi : आधीच्या सरकारांच्या काळातही पेपर फुटण्याच्या घटना घडल्या : जितेंद्र सिंह

Suraj Sakhare Attack : वडिलांचा पराभव अन् रस्त्याचं काम बंद पाडल्याचा राग! गुंड सूरज साखरेवरील गोळीबार महापालिका राजकारणातून; गणेश खाडेनं शूटरांना दिलेलं ॲडव्हान्स एक लाख

SCROLL FOR NEXT