Rajya Sabha Election sakal
देश

Rajya Sabha Election : सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर जाणार

काँग्रेसने बुधवारी राज्यसभेसाठी काँग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन, माजी केंद्रीय मंत्री रेणुका चौधरी यांना उमेदवारी दिली. तसेच तेलंगणातील युवा नेते अनिल कुमार यादव आणि गांधीकुटुंबाशी एकनिष्ठ असलेल्या मध्य प्रदेशातील अशोक सिंह यांनाही काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेसने बुधवारी राज्यसभेसाठी काँग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन, माजी केंद्रीय मंत्री रेणुका चौधरी यांना उमेदवारी दिली. तसेच तेलंगणातील युवा नेते अनिल कुमार यादव आणि गांधीकुटुंबाशी एकनिष्ठ असलेल्या मध्य प्रदेशातील अशोक सिंह यांनाही काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसने आज पक्षाच्या दहा उमेदवारांची यादी जाहीर केली. यात प्रामुख्याने सोनिया गांधी यांना राजस्थानमधून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीमध्ये पक्षाचे निष्ठावान नेते आणि तरुण नेत्यांवर विश्वास टाकल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष अजय माकन हे राहुल गांधी यांचे विश्वासू मानले जातात. त्यांची काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसचे कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती.

तेव्हापासून त्यांना राज्यसभेवर घेतले जाईल, असे बोलले जात होते. कर्नाटकमधून डॉ. सय्यद नासीर हुसैन आणि जी. सी. चंद्रशेखर या विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. यापैकी डॉ. सय्यद हुसैन हे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे विश्वासू मानले जातात. तेलंगणमधून काँग्रेसच्या फायर ब्रँड नेत्या रेणुका चौधरी यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्या टीडीपीमधून काँग्रेसमध्ये आल्या आहेत.

काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्या काँग्रेसच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याचप्रमाणे तेलंगणातून अनिलकुमार यादव या तरुण नेत्याला राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. तेलंगण युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या अनिलकुमार यादव यांच्यावर काँग्रेसने विश्वास टाकला आहे. सातत्याने पराभूत होणाऱ्याला उमेदवारी मध्यप्रदेशातून काँग्रेसने आश्चर्यकारकरीत्या अशोक सिंग यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.

अशोक सिंग यांचे कुटुंब काँग्रेसशी निष्ठावान राहिले आहे. अशोक सिंग सातत्याने ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार राहिले परंतु प्रत्येकवेळी त्यांना भाजप उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला. त्यांचे वडीलही काँग्रेसचे नेते होते. ग्वाल्हेर परिसरातील गांधीनिष्ठ कुटुंब म्हणून अशोक सिंग यांच्या कुटुंबाची ओळख आहे. त्यांना यावेळी अचानकपणे राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: What a Catch! शुभमन गिलचा श्रीलंकेला स्तब्ध करणारा झेल, भारताच्या फिरकीसमोर यजमान फेल! Video Viral

Model Antara Banerjee FIR : अभिनेत्रीचा धावत्या ट्रेनमध्ये RPF जवानावर रेझर ब्लेडने हल्ला; आधी स्वत:चे कपडे काढले अन् मग...

आंतरराष्ट्रीय सिनेमाच्या पडद्यावर सलमान-संजयची जोडी झळकणार, '7 डॉग्स' कधी होणार प्रदर्शित?

Sunetra Pawar: अजितदादांचा विकासाचा वारसा अर्ध्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा निर्धार, महिलांसाठी ‘दादा उद्योगिनी’ ॲप

Loggerhead Turtle: अरबी समुद्रातून १०० किलो वजनाच्या दुर्मिळ 'लॉगरहेड' कासवाची सुटका

SCROLL FOR NEXT