रविशंकर प्रसाद
रविशंकर प्रसाद सकाळ
देश

काँग्रेस पक्षाची सर्व संपत्ती गांधी घराण्याच्या खिशात - रविशंकर प्रसाद

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आज चौकशी साठी ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत. त्याच्या निषेधार्थ आज काँग्रेसकडून देशभर निदर्शने आणि आंदोलने करण्यात येत आहेत. दरम्यान काँग्रेस आणि भाजप नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रात्यारोप चालू झाले आहेत. भाजपचे रविशंकर प्रसाद यांनी हा सत्याग्रह नसून दुराग्रह असल्याची टीका काँग्रेसवर केली आहे.

(Soniya Gandhi ED Investigation)

काँग्रेसच्या नेत्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर हा राजकीय सूडाचा भाग आहे असं म्हणत यूपीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी ईडीच्या या प्रवृत्तीचा जाहीर निषेध केला आहे. त्यानंतर काँग्रेसकडून देशभरात आंदोलने केली जात आहेत. हा सत्याग्रह असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तर हा सत्याग्रह नसून दुराग्रह आहे असा आरोप भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाची सर्व संपत्ती ही गांधी घराण्याच्या खिशात असल्याचा आरोप भाजपचे रविशंकर प्रसाद यांच्याकडून केला जात आहे.

दरम्यान, याआधीही काँग्रसचे नेते राहुल गांधी यांची ईडीने चौकशी केली होती. त्यावेळीही काँग्रेसकडून निदर्शने आणि आंदोलने केली गेली होती. महाराष्ट्रात काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जात आहे. यावेळी प्रणिती शिंदे आणि काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT