Crime News Esakal
देश

Crime News: अत्याचार प्रकरणात 2 अल्पवयीन मुलं होती ताब्यात, बदला म्हणून वडिलांनी उचललं धक्कादायक पाऊल

Sons held for assault : झारखंडमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका ५० वर्षीय महिलेची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

कार्तिक पुजारी

गुमला- झारखंडमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका ५० वर्षीय महिलेची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. हत्या करण्यात आलेल्या महिलेच्या मुलीसोबत दोन अल्पवयीन मुलांनी बलात्कार केला होता. या अल्पवयीन मुलांच्या वडिलांनी महिलेची हत्या केली आहे. सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Sons held for assault their dads hack survivor mother to death in Jharkhand)

आरोपी आणि पीडित मुलगी आणि महिला एकाच गावातील आहेत. पीडित मुलीची आई शेतामध्ये काम करत होती. त्यावेळी तिच्यावर दोन अल्पवयीन मुलांच्या वडिलांनी हल्ला केला. अल्पवयीन मुले सध्या बालसुधारगृहात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंब आणि आरोपी यांच्यामध्ये खूप काळापासून वाद होता. स्थानिक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांनी शस्त्र जप्त केले आहेत.

मुलांविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीचा बदला म्हणून आणि जमिनीच्या संदर्भातील वादातून ही हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. १३ मार्च रोजी महिला आणि तिची मुलगी घरी झोपले होते. मोठी मुलगी लग्न सोहळ्यासाठी बाहेर गेली होती. त्यावेळी आरोपींची १४ वर्षांची दोन मुले घरी आली आणि त्यांनी बहाणा करुन आईला बाहेर जाण्यास सांगितलं.

महिला आपल्या मोठ्या मुलीच्या शोधात घराबाहेर पडली. यावेळी दोन मुलांनी ऐकू आणि बोलू न शकणाऱ्या १९ वर्षीय मुलीला शाळेच्या इमारतीमध्ये ओढत नेले आणि त्याठिकाणी तिच्यावर बलात्कार करण्यात आला, असं दावा याप्रकरणात तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. (Crime News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Deepotsav Controversy : ‘’दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम सुद्धा आपलेच आहेत, हे दाखवण्यापर्यंत सरकार...’’ ; मनसेचा आरोप!

ZIM vs AFG : झिम्बाब्वेचा कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय! Blessing Muzarabani ने मोडला मोहम्मद सिराजचा विक्रम

Mehul Choksi: मेहुल चोक्सीला भारतात आणणार! मुंबईतील 'या' तुरूंगात होणार रवानगी, कशी असणार सुविधा?

Siddaramaiah Latest News : सिद्धरामय्या घेताय राजकारणातून निवृत्ती? ; मुलाच्या विधानाने कर्नाटकातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

Latest Marathi News Live Update : युनिट-१ भाजी मार्केटमधील २० दुकानांना भीषण आग

SCROLL FOR NEXT