piyush goyal 
देश

Piyush Goyal : आता लवकरच अनेक देशांशी आंतरराष्ट्रीय व्यापार रुपयात होईल; पियुष गोयल यांचं विधान

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - व्यापारी लवकरच परकीय व्यापाराचा निपटारा रुपयांत करू शकतील, अशी आशा वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी शनिवारी व्यक्त केली. विविध देशांतील अनेक बँका भारतीय बँकांमध्ये विशेष खाती उघडत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ब्रिटन, सिंगापूर आणि न्यूझीलंडसह १८ देशांतील संबंधित बँकांमध्ये विशेष रुपयांची खाती (एसआरव्हीए) उघडण्याच्या ६० विनंत्यांना मान्यता दिल्याचे ते म्हणाले.

पियुष गोयल म्हणाले की, मध्यवर्ती बँक विविध देशांतील आपल्या समकक्षांशी या विषयावर चर्चा करत आहे. युरोपियन युनियन, ब्रिटन आणि कॅनडा सारख्या विकसित देशांबरोबर मुक्त व्यापार कराराच्या (एफटीए) वाटाघाटी प्रगत टप्प्यात आहेत, असे गोयल यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याविषयी बोलताना गोयल म्हणाले की, संपूर्ण जगाला भारतासोबत व्यापक आर्थिक भागीदारी करार करायचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT