स्पेनच्या पर्यटक महिलेवर झारखंडमध्ये बलात्कार Sakal
देश

Jharkhand Crime News : स्पेनच्या पर्यटक महिलेवर झारखंडमध्ये बलात्कार

दुचाकीवरून पर्यटन करणाऱ्या स्पेनच्या महिलेवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना झारखंडमध्ये शुक्रवारी रात्री घडली. हा प्रकार हंसडिहा पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुरमाहाट येथे घडल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

रांची : दुचाकीवरून पर्यटन करणाऱ्या स्पेनच्या महिलेवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना झारखंडमध्ये शुक्रवारी रात्री घडली. हा प्रकार हंसडिहा पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुरमाहाट येथे घडल्याचे सांगितले जात आहे.

याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पीडित महिलेस मारहाण केली असून सरय्याहाट येथील प्रथमोपचारानंतर तिला दुमका येथे आणले. पीडित महिला स्वत:च बाईक चालवतच सरय्याहाट येथून दुमकाला पोचली.

स्पेनची २८ वर्षीय महिला आपल्या पतीसमवेत भारतात पर्यटनासाठी आली होती. ते दोघेही वेगवेगळ्या बाईकवरुन प्रवास करत होते. हे जोडपे दुचाकीवरून बांगलादेशहून दुमकाला पोचले होते. तेथून बिहारमार्गे नेपाळला जाणार होते.

ते भागलपूरकडे जात होते. रात्री उशीर झाल्याने हंसडीहा बाजाराच्या अगोदर एका सामसूम ठिकाणी तंबू उभारला आणि ती महिला झोपली. मात्र परिसरातील युवक तेथे आले आणि त्यांनी सामूहिक बलात्कार केला. तिला मारहाणही केली. या घटनेनंतर आरोपी पळून गेले. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, पाच ते सहा लोकांनी अत्याचार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Minister absence from Cabinet Meeting : शिवसेनेचे मंत्री कॅबिनेट बैठकीला का होते गैरहजर?, उदय सामंतांनी सांगितलं नेमकं कारण, म्हणाले...

ती परत येतेय! 11 वर्षानंतर रेखा पुन्हा सिनेमामध्ये पहायला मिळणार, व्या 71 वर्षी पुन्हा झळकणार अभिनयाची जादू

Goa New Rules : गोव्याला जाताय? मग अजिबात करू नका 'या' 3 चुका, नाहीतर नव्या नियमानुसार द्यावा लागेल हजारोंचा दंड

Horoscope Prediction : मेष ते मीन..संपूर्ण राशीभविष्य! उद्याचा दिवस कसा असेल? कुणाला मिळणार गुड न्यूज अन् कुणाला बॅड न्यूज, जाणून घ्या

बिग बॉस मराठी फेम शिव ठाकरेच्या मुंबईतील घराला लागली आग; थोडक्यात वाचला अभिनेता

SCROLL FOR NEXT