Rape Sakal
देश

१४ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार, विशेष न्यायाधीशासह तिघांवर गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

जयपूर : राजस्थानममधील भरतपूर (Bharatpur Rajsathan) जिल्ह्यात १४ वर्षीय अल्पवीयन मुलावर तिघांनी अनैसर्गिक अत्याचार (minor boy physical abused) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विशेष न्यायाधीशांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच न्यायाधीशाला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित मुलगा हा स्टेडीयममध्ये टेनिस खेळण्यासाठी जात होता. इथं अनेक अधिकारी आणि न्यायाधीश देखील खेळण्यासाठी येतात. आरोपी न्यायाधीशाने त्या मुलाशी तिथेच मैत्री केली आणि त्याला स्टेडियममधून त्याच्या घरी नेले. तेथे काही अंमली पदार्थ पाजून मुलावर अत्याचार करण्यात आला. महिनाभर हा अत्याचार सुरू होता. त्यानंतर मुलाला वेदना होऊ लागल्याने त्याने आपल्या आईला घडलेला प्रकरा सांगितला. तसेच या घटनेबाबत कोणाला सांगितले, तर मुलाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी न्यायाधीशासह तिन्ही आरोपींनी दिली होती. याबाबत 'इंडिया टूडे'ने वृत्त दिले आहे.

न्यायाधीशांचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. यामध्ये तो पीडितेच्या आईला माफी मागत असून घटनेबद्दल विसरून जा, असं सांगतेय. पीडित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोक्सो कायद्याच्या कलमांतर्गत न्यायाधीश आणि इतर दोघांविरुद्ध बलात्कार आणि इतर आरोपांसाठी एफआयआर नोंदवण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले.

पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी असाही आरोप केला आहे की, एसीबीच्या सर्कल ऑफिसरसह अन्य दोन आरोपींनी मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Rain Forecast : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा ओसरला; पाऊस थांबणार, मुंबईसह घाटमाथ्यांवर इशारा

Ashadhi Wari: ४३ वर्षांची अखंड परंपरा कायम! गंगापूरहून १२०० वारकऱ्यांची पायी दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ; भक्ती, शिस्त आणि परंपरेचा अनोखा संगम

Pune Rain Update : खडकवासला धरणातून विसर्ग वाढला, मुठा नदीकाठच्या अनेक घरांत पाणी शिरले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Satara Rain : साताऱ्यात अतिवृष्टीचा तडाखा! जिल्ह्यात ८३ घरांचे नुकसान, सहा पशुधन दगावले, हवामान विभागाचा काय इशारा..

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी: मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रवास सुखकर होण्यासाठी यंत्रणा सज्ज

SCROLL FOR NEXT