SpiceJet.
SpiceJet. 
देश

स्पाइसजेट प्रकरणी लवकर सुनावणी करा अन्यथा...; कंपनीची SC ला विनंती

सकाळ डिजिटल टीम

जवळपास १८० कोटी रुपयांच्या थकीत प्रकरणी सुरु असलेला वाद संपवण्यासाठी स्पाइसजेटने याचिका दाखल केली आहे.

नवी दिल्ली - स्पाइसजेट एअऱलाइन्स (SpiceJet) भरपाईच्या वादावरून सुप्रीम कोर्टात (Supreme court) पोहोचली आहे. न्यायालयात कंपनीने लवकरात लवकर सुनावणी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसंच याचिकेत असंही म्हटलं आहे की, जर लवकर सुनावणी केली नाही तर कंपनी बंद पडेल. सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा यावर लवकर सुनावणी करू असं म्हटलं आहे.

सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांनी म्हटलं की, न्यायालय पुढची सुनावणी २८ जानेवारी रोजी करेल. स्पाइसजेटने केलेल्या मागणीसंदर्भात कंपनीकडून मुकुल रोहतगी यांनी म्हटलं होतं की, या प्रकरणाची लवकर सुनावणी झाली नाही तर एअरलाइन बंद होईल. या प्रकरणी शुक्रवारी सुनावणी करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली होती.

स्वीसची आर्थिक सेवा पुरवणारी कंपनी क्रेडिट सुइस एजी कडून जवळपास १८० कोटी रुपयांच्या थकीत प्रकरणी सुरु असलेला वाद संपवण्यासाठी स्पाइसजेटने याचिका दाखल केली आहे. स्पाइसजेटने डिसेंबर २०१९ मध्ये शेवटचा नफा कमावला होता. यंदाच्या आर्थिक वर्षात दुसऱ्या तिमाहीतील नुकसान हे आधीच्या तुलनेत ५६१ कोटी रुपयांहून अधिक झालं आहे. गेल्या वर्षी शेअर्समध्ये जवळपास ३० टक्के घसरण झाली होती. कंपनीची निगेटिव्ह नेटवर्थ ही २०१४ मध्ये जितकी होती तेवढीच होण्याच्या मार्गावर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT