Boris Jonson
Boris Jonson 
देश

बोरिस जॉन्सन यांची चरख्यावर सूत कताई; गांधीजींबद्दल काढले गौरवोद्गार

सकाळ डिजिटल टीम

साबरमती : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे सध्या दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. भारतात दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रथम गुजरातमधील गाधीजींच्या साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी चरख्यावर सूतकताई केली तसेच म. गाधींबद्दल गौरवोद्गार काढले. (Spinning on a spinning wheel by UK PM Boris Johnson Praise for Gandhiji)

बोरिस जॉन्सन याचं विमानतळावर उत्साहात स्वागत करण्यात आलं. यानंतर साबरमती आश्रमापर्यंत त्याच्या ताफ्याच्या दुतर्फा नृत्य कलाकारांमार्फत पारंपारिक नृत्य सादर त्यांचं स्वागत करण्यात आलं. दरम्यान, आश्रमात पोहोचल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री भूपेष पटेल हे त्यांच्यासोबत होते. यावेळी जॉन्सन यांना संपूर्ण आश्रमाची माहिती देण्यात आली. यावेळी त्यांना महात्मा गांधी यांचं सुरुवातीच्या काळात प्रकाशित होऊ न शकलेल्या पुस्तकांपैकी एक असलेलं 'गाईड टू लंडन' हे पुस्तक भेट देण्यात आलं. त्याचबरोबर 'द स्पिरिट ऑफ पिलग्रिमेज' हे मॅडेलिन स्लेड यांचं आत्मचरित्रही भेट देण्यात आलं. स्लेड या गाधीजींच्या शिष्या होत्या. त्यांनी साबरमती आश्रमात आपलं आयुष्य व्यतीत केलं.

दरम्यान, बोरिस यांनी आश्रमातील नोंदवहीत काही ओळीही लिहिल्या. यामध्ये ते म्हणतात, या (म. गांधी) विलक्षण माणसाच्या आश्रमात येणं हे माझ्यासाठी मोठं सौभाग्य आहे. तसेच जगामध्ये चांगला बदल घडवून आणण्यासाठी सत्य आणि अहिंसेची साधी तत्त्वंही त्यांनी कशी एकत्रित आणली हे समजून घेणं देखील माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : ‘पीओके’ भारताचेच, आम्ही ते घेऊ ;अमित शहा

आजचे राशिभविष्य - 17 मे 2024

Latest Marathi News Live Update : महायुतीची शिवाजी पार्कवर तर, इंडिया आघाडीची बीकेसी मैदानावर आज सांगता सभा

पुण्याचा चालता-बोलता इतिहास

Loksabha Election : पहिल्या चार टप्प्यांत ६६.९५ टक्के मतदान ; अधिकाधिक मतदानाचे आयोगाचे आवाहन

SCROLL FOR NEXT